अकोला शहरातील १११ गुन्हेगार तडीपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:24 IST2019-04-13T13:24:40+5:302019-04-13T13:24:50+5:30
अकोला : शहरात मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १११ सराईत गुन्हेगारांना १३ व १४ एप्रिल रोजी तडीपार करण्यात आले आहे.

अकोला शहरातील १११ गुन्हेगार तडीपार!
अकोला : शहरात मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १११ सराईत गुन्हेगारांना १३ व १४ एप्रिल रोजी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा हा आदेश १२ एप्रिल रोजी देण्यात आला आहे.
शहरात श्रीरामनवमीचा उत्सव १३ एप्रिल रोजी तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातून मिरवणुकीचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (२) नुसार अधिकाराचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत असलेल्या १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत १३, जुने शहर पोलीस स्टेशन २९, एमआयडीसी पोलीस स्टेशन १५, डाबकी रोड पोलीस स्टेशन १६, खदान पोलीस स्टेशन ०८, रामदास पेठ पोलीस स्टेशन १३, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन १७ असे एकूण १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.