अकोला जिल्ह्यातील १.१३ लाख शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:23 PM2019-03-01T14:23:13+5:302019-03-01T14:23:19+5:30
अकोला: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत मिळणार आहे.
अकोला: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत मिळणार आहे. त्यासाठी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असून, २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ४३८ शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत शेतकºयांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांची माहिती संकलित करून पात्र शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर सुरू आहे. त्यामध्ये २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ९६४ गावांमधील १ लाख १३ हजार ४३८ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय ‘अपलोड’ अशा आहेत शेतकºयांच्या याद्या!
तालुका शेतकरी
पातूर १३४१९
तेल्हारा १८४३९
अकोला १७२७२
अकोट २०९८०
मूर्तिजापूर १३६०१
बाळापूर १५३११
बार्शीटाकळी १४४१६
..........................................
एकूण ११२४३८