सावकारांनी बळकावलेली ११५ एकर जमीन २२ शेतकऱ्यांना परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:59 AM2018-04-24T10:59:48+5:302018-04-24T11:04:32+5:30
अकोला : अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन सहकार विभागाच्या जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत २२ शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत परत करण्यात आली.
- संतोष येलकर
अकोला : अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन सहकार विभागाच्या जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत २२ शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत परत करण्यात आली. परत करण्यात आलेल्या जमिनीचा सात-बारा संबंधित शेतकºयांच्या नावाने करण्यात आला आहे.
जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था )कार्यालय अंतर्गत गत वर्षभरात अवैध सावकारीचे ६५ प्रकरणे दाखल करण्यात आली. दाखल प्रकरणांपैकी २२ प्रकरणांत गत मार्च अखेरपर्यंत आदेश पारित करण्यात आले. त्यामध्ये अवैध सावकारीतून सावकारांनी २२ शेतकºयांच्या बळकावलेल्या जमिनी परत करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच अवैध सावकारीतून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यासंदर्भात संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. मार्च अखेरपर्यंत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवैध सावकारीतून सावकारांनी २२ शेतकऱ्यांची बळकावलेली ११५ एकर १३ आर जमीन संंंंंबंधित शेतकºयांना परत करण्यात आली असून, जमिनींचा सात-बारा संबंधित शेतकऱ्यां च्या नावाने करण्यात आला आहे. जमीन परत मिळाल्याने, सावकारग्रस्त शेतकºयांना दिलासा मिळाला.
२० प्रकरणे खारीज; ९ प्रकरणे फेटाळली !
अवैध सावकारीसंदर्भात जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) कार्यालय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये २० प्रकरणे कालमर्यादा बाहेरील (१५ वर्षांपूर्वीची )असल्याने, अवैध सावकारीची ही २० प्रकरणे जिल्हा उप-निबंधक कार्यालयामार्फत खारीज करण्यात आली आहेत, तर अवैध सावकारीची ९ प्रकरणे कायदेशीर नसल्याने ही प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत.
१४ प्रकरणांत सुनावणी सुरू!
अवैध सावकारीच्या प्रकरणांत जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) अंतर्गत दाखल प्रकरणांपैकी १४ प्रकरणांत जिल्हा उप-निबंधकांकडे अद्याप सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. अवैध सावकारीच्या या १४ प्रकरणांत जिल्हा उप-निबंधकांमार्फत लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहेत.
अवैध सावकारीच्या प्रकरणांत दाखल प्रकरणांपैकी मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात अवैध सावकारीतून सावकारांनी बळकावलेली २२ शेतकºयांची ११५ एकर १३ आर शेतजमीन शेतकºयांना परत करण्यात आली. जमिनींचा सात-बारा संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्यात आला, तसेच शेतकºयांची जमीन बळकावणाऱ्या संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
-जी.जी.मावळे, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था )