काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, चेक पाॅईंटसाठी ११५ शिक्षक कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:17+5:302021-04-29T04:14:17+5:30

हायरिस्कमधील संशयितांचा घेणार शाेध पूर्व झाेनमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील संशयितांचा शाेध घेण्यासाठी ३० शिक्षक व चेक पाॅईंटसाठी ३० ...

115 teachers work for contact tracing, check point | काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, चेक पाॅईंटसाठी ११५ शिक्षक कामाला

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, चेक पाॅईंटसाठी ११५ शिक्षक कामाला

Next

हायरिस्कमधील संशयितांचा घेणार शाेध

पूर्व झाेनमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील संशयितांचा शाेध घेण्यासाठी ३० शिक्षक व चेक पाॅईंटसाठी ३० शिक्षकांची नियुक्ती केली आहे, तसेच दक्षिण झाेनमध्ये हायरिस्कमधील संशयितांचा शाेध घेण्यासाठी ३० शिक्षक व चेक पाॅईंटसाठी २५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

८ मे पर्यंत घराबाहेर निघण्यास मनाई

पूर्व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा माेठ्या प्रमाणात फैलाव झाला असून, घराेघरी काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या दाेन्ही झाेनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे ध्यानात आल्यानंतर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. वैद्यकीय कारणाशिवाय या भागातील नागरिकांना ८ मे पर्यंत घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांकडून ठेंगा

या दाेन्ही झाेनमधील खासगी रुग्‍णालये व क्लिनिकमध्‍ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्‍णांपैकी कोरोनासदृश लक्षणे असलेल्‍या नागरिकांची महापालिकेला माहिती सादर करणे बंधनकारक आहे. मनपाच्या निर्देशांना ठेंगा दाखवत या झाेनमधील खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे.

Web Title: 115 teachers work for contact tracing, check point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.