२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:08+5:302021-06-09T04:23:08+5:30
महापालिका क्षेत्रात धाेकादायक व शिकस्त इमारतींची माेठी संख्या आहे. अशा इमारतींचे मनपाच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच ...
महापालिका क्षेत्रात धाेकादायक व शिकस्त इमारतींची माेठी संख्या आहे. अशा इमारतींचे मनपाच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच इमारतींमधील मालमत्ताधारकांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली जाते. नाेटीस प्राप्त झाल्यानंतरही मालमत्ताधारक इमारत साेडत नाहीत. अनेकांचे वडिलाेपार्जित हक्क, दावे-प्रतिदावे असून न्यायालयात सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील काही इमारतींमध्ये मागील ४० ते ५० वर्षांपासून ठाण मांडलेल्या भाडेकरूंनीही हक्क दाखल केले आहेत. अर्थात, या सर्व कारणांमुळे मरणाची टांगती तलवार असूनही नाइलाजाने मालमत्ताधारकांचा शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये मुक्काम आहे.
झाेननिहाय शिकस्त इमारती
पूर्व झाेन - ६८
पश्चिम झाेन - ९५
उत्तर झाेन - ७०
दक्षिण झाेनमध्ये सर्वे सुरूच!
पावसाळा ताेंडावर आल्यानंतरही दक्षिण झाेनमधील शिकस्त इमारतींचा सर्वे सुरूच असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्वरित तीनही झाेनमधील धाेकादायक इमारतींमधील रहिवाशांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सारे काही कळते, पण कुठे जाणार?
इमारत शिकस्त असली तरी आमच्या संपत्तीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हक्काच्या लढाईसाठी जीव धाेक्यात घालून या ठिकाणी राहत आहे.
- युसूफ शेख
वडिलांच्या संपत्तीत सामायिक हिस्सेदारी आहे. परंतु आपसात बेबनाव असल्याने काेणीही इमारत खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या ठिकाणी राहत आहे.
- दिनेश भट्टड
या इमारतीमध्ये भाडेतत्वानुसार आमच्या दाेन पिढ्यांचे वास्तव्य गेले. आता तीसरी पिढी राहत आहे. आम्ही घर साेडल्यास जायचे काेठे, असा सवाल आहे.
- प्रवीण मिश्रा
वारंवार दिल्या नाेटिसा
शहरात सर्वाधिक धाेकादायक इमारती पश्चिम झाेन व त्यापाठाेपाठ उत्तर झाेनमध्ये आहेत. आम्ही रहिवाशांना नाेटिसा दिल्यानंतरही ते इमारत साेडत नसल्याची माहिती झाेन अधिकारी राजेंद्र टापरे यांनी दिली.
इमारत पडल्यास जबाबदार काेण?
पावसाळ्यात धाेकादायक इमारती काेसळण्याची शक्यता राहते. अशा इमारती उभ्या असल्यामुळे परिसरातील इतर रहिवाशांच्या जीवितालाही धाेका निर्माण झाला आहे. मनपाने नाेटिसा देऊन औपचारिकता निभावली असली तरी इमारत पडल्यास जबाबदार काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.