ज्ञानगंगा अभयारण्यात ११६३ वन्य प्राणी

By Admin | Published: May 23, 2016 01:41 AM2016-05-23T01:41:10+5:302016-05-23T01:41:10+5:30

बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात पाणवठय़ांवर झाली गणना : बिबट ८, अस्वल ३३ यांच्यासह इतर प्राणी.

1163 wild animals in Dnyanganga Wildlife Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यात ११६३ वन्य प्राणी

ज्ञानगंगा अभयारण्यात ११६३ वन्य प्राणी

googlenewsNext

बुलडाणा: बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात २१ मे रोजीच्या रात्री ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात असलेल्या पाणवठय़ांवर वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेमध्ये अभयारण्यात एकूण ११६३ वन्य प्राणी आढळून आले. दरवर्षी उन्हाळ्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य जीव विभागाकडून अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्यात येते. ही गणना उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठय़ावर पाणी पिण्यास वन्य प्राणी येत असल्याने सोपी जाते. त्यामुळे याच दिवशी ही वन्य प्राणी गणना अनेक वर्षांंपासून केली जाते. यावर्षीही याच पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राणी गणना करण्यात आली. यासाठी नक्षत्रवन, टॉवर, निसर्ग परिचय केंद्र, बोरवन, मोहीमची झिल, पिंपळदरी, संरक्षण कुटी वाकी, हापशी, वैरागड संरक्षण कुटी, मारोतीचा पेठा, तारापूर वनकुटी, इकोफ्रेन्डली बशी, पलढग धरण, माटरगाव धरण, गिरोली धरण, बोथा तलाव अशा १९ पाणवठे परिसरात मचाण बांधण्यात आले होते. या १९ पाणवठय़ांवर २१ मेच्या रात्रभर एकूण ११६३ वन्य प्राणी वन्य जीव विभागाला आढळून आले. यामध्ये चिंकारा २१, भेडकी ४0, रानडुक्कर ३0१, वानर २११, नीलगाय ३२६, ससा १७, बिबट ८, अस्वल ३३, तडस १0, सायळ ९, मोर १५४, चितळ ३, खवली मांजर ७, मसन्याऊद ४, कोल्हा ८, रानकुत्रे ८, लांडगा ५ अशा एकूण ११६३ वन्य प्राण्यांचा समावेश आहे.

Web Title: 1163 wild animals in Dnyanganga Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.