आगर शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:09+5:302021-07-07T04:23:09+5:30
आगर : राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर ओळखला जातो. ग्रामीण भागात नदीकाठी तसेच नाल्याच्या काठावर असलेल्या झाडावर मोरांची गर्दी ...
आगर : राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर ओळखला जातो. ग्रामीण भागात नदीकाठी तसेच नाल्याच्या काठावर असलेल्या झाडावर मोरांची गर्दी दिसून येते. आगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोलखड नाल्याजवळ मोरांचे वास्तव्य आहे.
५ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास नाल्याजवळ गुराख्याला १२ मोर मृतावस्थेत दिसून आले. घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच, त्यांनी नाल्याच्या काठावर धाव घेतली. काही मोर रस्त्यावर तर काही मोर झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसले.
गावकरी नाल्याजवळ जाण्याअगोदरच गावातील कुत्रे, कोल्हे या प्राण्यांनी या पक्ष्यांचे लचके तोडले व काही मोर इतर वन्य प्राण्यांनी फस्त केले. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे पेरणी बियाण्याला विषारी लिक्विड लावले होते. मोर, लांडाेर या पक्ष्यांनीही बियाणे खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फोटो:
घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करणार
राष्ट्रीय पक्षी म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या मोरांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भात लवकरच घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती वनपाल इंगळे वनक्षेत्र कार्यालय अकोला यांनी दिली आहे.