अमरावती-पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द; भूसावळ येथे ३० व ३१ मार्चला ब्लॉक
By Atul.jaiswal | Published: March 28, 2023 07:49 PM2023-03-28T19:49:08+5:302023-03-28T19:49:17+5:30
अकोला : मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान चवथ्या लाईनचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार, ३० ...
अकोला :
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान चवथ्या लाईनचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार, ३० व शुक्रवार ३१ मार्च असा दोन दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत मुंबई-हावडा मार्गावरील अमरावती-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमरावती-सुरत एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह तब्बल ३० गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यापैकी १२ गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांची धाव मर्यादित करण्यात आली आहे,
कोणती गाडी कधी रद्द?
गाडी - या तारखेला रद्द
पुणे-अमरावती एक्स्प्रेस - २९ मार्च
अमरावती-पुणे एक्स्प्रेस - ३० मार्च
सुरत-अमरावती एक्स्प्रेस - ३० व ३१ मार्च
अमरावती-सुरत एक्स्प्रेस - ३१ मार्च व १ एप्रिल
नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस - २९ मार्च
अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्च
पुणे-नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्च
नागपूर-पुणे एक्स्प्रेस - ३१ मार्च
भूसावळ -वर्धा एक्स्प्रेस - ३१ मार्च
वर्धा - भूसावळ एक्स्प्रेस - ३१ मार्च
कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस - २९ मार्च
गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस - ३१ मार्च