गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:27 PM2020-03-31T16:27:17+5:302020-03-31T16:31:57+5:30

बिडगाव फाट्यावर दोन्ही पकडले असता अनेक लोक त्या ट्रक मधून कोंबून एकत्र प्रवास करताना आढळून आले.

120 laborers from Gujarat cauthght at murtijapur | गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास

गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास

Next
ठळक मुद्देदोन ट्रक मधून १२० लोकांना कोंबून नेण्यात येत होते.वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.त्यांना दहातोंडा येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.

मूर्तिजापूर : देश कोरोना विषाणुच्या प्रभावाखाली असताना गुजरात मधून अनेक लोकांना ट्रकमध्ये कोंबून वाहतुक सुरू असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी कारंजा रोडवर बिडगाव फाटा नजीक मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. दोन ट्रक मधून १२० लोकांना कोंबून नेण्यात येत होते.या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना दहातोंडा येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य तसेच जिल्हा बंदी असतानाही एका ठिकाणाहून दुसरीकडे शेकडो लोक चोरुन एकत्र प्रवास करीत आहेत. संचारबंदी दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी कर्त्तव्यावर असताना समोरून जाणाऱ्या दोन ट्रक बाबत त्यांना संशय आला. त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग करून बिडगाव फाट्यावर दोन्ही पकडले असता अनेक लोक त्या ट्रक मधून कोंबून एकत्र प्रवास करताना आढळून आले.
अहमदाबाद गुजरात येथून ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ०४०१ व एमएच ४० बीए ५७५६ यामध्ये महिला व बालकांसह १२० लोकांना एकत्र कोंबून कारंजा, दिग्रस व धुळे कडे नेत असताना कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार गजानन झोपे व अश्विन चव्हाण यांनी पाठलाग करुन बिडगाव फाट्यावर पकडले. या दरम्यान तिसरा ट्रक पसार झाल्याची माहिती आहे. कोंबून आणलेल्या लोकांची तात्पुरती निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील शाळेत करण्यात आली असून त्याच ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार रहीम शेख, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी भेट दिली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी )

ट्रक मधून आलेल्या मजुरांच्या निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील आश्रमशाळेत करण्यात आली आहे. इतर व्यवस्था येथील स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत लोकांची तपासणी झाली आहे. यापूढे वरील आदेश येईपर्यंत त्यांना इथेच ठेवण्यात येणार आहे.
अभयसींह मोहिते,उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

 

Web Title: 120 laborers from Gujarat cauthght at murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.