कृषी पंपांची थकबाकी १२00 कोटींवर

By admin | Published: April 22, 2017 06:39 PM2017-04-22T18:39:44+5:302017-04-22T18:39:44+5:30

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडे १,२४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

1200 crores for agricultural pumps | कृषी पंपांची थकबाकी १२00 कोटींवर

कृषी पंपांची थकबाकी १२00 कोटींवर

Next

अकोला परिमंडळ : सर्वाधिक थकबाकी बुलडाणा जिल्हय़ाची
अकोला : महावितरणचा वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये कृषी पंपधारकांकडे मोठी रक्कम थकीत आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडे १,२४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना अव्याहतपणे वीज पुरवठा केला जात असला, तरी या ग्राहकांकडील वीज देयकांची वसुली करताना मात्र महावितरणच्या नाकीनऊ येत आहेत. राज्यभरातील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वीज पुरवठय़ाच्या तुलनेत अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडे मोठी रक्कम थकीत आहे. कृषी पंपधारकांकडील थकबाकीचा आकडा सर्वात मोठा आहे. मार्च २0१७ अखेरपर्यंत अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांतील जवळपास दोन लाख कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडे १,२४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयक भरण्यास टाळाटाळ होत असल्याने दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. थकबाकी वाढत असल्याने महावितरणने थकबाकीदार ग्राहकांकडून थकीत वीज देयकांची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांनी थकीत वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हानिहाय अशी आहे थकबाकी
जिल्हाथकबाकी
अकोला२४४ कोटी
बुलडाणा७२0 कोटी
वाशिम२७८ कोटी
--------------------------
एकूण१,२४२ कोटी

Web Title: 1200 crores for agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.