अकोल्यातून अमरावती येथे नेण्यात आलेल्या १२०० जिलेटीनच्या कांड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:18 AM2021-04-06T04:18:06+5:302021-04-06T04:18:06+5:30

अमरावती एटीएसची कारवाई अकोला : अमरावती दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० जिलेटीनच्या ...

1200 gelatin sticks taken from Akola to Amravati seized | अकोल्यातून अमरावती येथे नेण्यात आलेल्या १२०० जिलेटीनच्या कांड्या जप्त

अकोल्यातून अमरावती येथे नेण्यात आलेल्या १२०० जिलेटीनच्या कांड्या जप्त

Next

अमरावती एटीएसची कारवाई

अकोला : अमरावती दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० जिलेटीनच्या कांड्या सोमवारी जप्त केल्या. स्फोटक पदार्थांचा हा साठा अकोला येथून तीन वाहनांमध्ये भरून अमरावती येथे नेण्यात येत होता. पथकाने सोमवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली.

अकाेला पासिंगची असलेली ही वाहने अमरावती पोलीस आयुक्तालय परिसरातील जोग स्टेडियममध्ये ठेवण्यात आली आहेत. जिलेटीन कांड्यांची ही खेप अकोल्यावरून आणण्यात आल्याची माहिती आहे; मात्र त्यांच्याकडे यासंदर्भात अधिकृत दस्तावेज नसल्याने ही वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून या स्फोटकांच्या साठ्यामध्ये अकोल्यातील कोण सहभागी आहेत याचा तपास अमरावती पोलीस करीत आहेत. विहीर व खदानाकरिता सदर जिलेटीनचा वापर करण्यात येतो. मात्र, सदर जिलेटीन अधिकृत आहेत काय, हा साठा कुणाच्या मालकीचा याची चौकशी एटीएसचे अधिकारी करीत आहेत. याप्रकरणी तीन वाहनचालकांना पथकाने ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. सदर वाहनचालकांकडे जिलेटीन कुणाचे आहे, यासंदर्भातील स्पष्टता सांगणारी कुठलीही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाही. त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर वाहने जप्त केली आहेत व चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले. काही आठवड्यांपूर्वी तिवसा तालुक्यातील मोझरी येथे मोठ्या प्रमाणात जिलेटीन कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या, हे विशेष!

एटीएसच्या पथकाने सदर कारवाई केली. त्या तीन वाहनांत १२०० ते १५०० जिलेटीन कांड्या असण्याची शक्यता आहे. त्यांची मोजणी सुरू आहे. त्या कशासाठी आणल्या, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती शहर

जप्त केलेले तीनही वाहने अकोल्यातील

एमएच ३० एल ४९९५, एमएच ३० एबी ४२५३, एमएच ३० एबी २६५२ क्रमांकाच्या वाहनातून सदर स्फोटकांची (जिलेटीन कांड्या) वाहतूक करण्यात आली. ती पथकाने जप्त केली आहेत. ही तीनही वाहने अकोला पासिंगची असल्याने या स्फोटकांचा मालक कोण याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: 1200 gelatin sticks taken from Akola to Amravati seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.