‘इटीएफ’मार्फत १२ हजार शिक्षक देतात विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:29 AM2019-02-09T10:29:15+5:302019-02-09T10:29:18+5:30
अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम राबविला जात आहे.
अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील तब्बल १२ हजार शिक्षक शाळांमध्ये ८ ते १0 वीतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देत आहेत.
सध्याची पिढी अनेक बाबतीत सरस आहे. या पिढीसोबत जुळवून घेताना, शिक्षक तंत्रस्नेही व्हावा, त्याला विषयाचे योग्य ज्ञान मिळावे आणि राज्यातील शासनमान्य माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजीचे शिक्षण घेता यावे, या हेतूने आरएए(रा) औरंगाबाद संस्थेमार्फत ‘इंग्लिश टिचर फोरम’ हा उपक्रम राबविला जातो. इटीएफच्या माध्यमातून शिक्षकांना सोप्या पद्धतीने इंग्रजी अध्यापन करता यावे, जागतिक स्तरावरील इंग्रजी विषयावरील संशोधनाची त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना तंत्रस्नेही शिक्षक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चेस इटीएफ २0१८-१९ हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा राज्यभर राबविण्यात येत आहे. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना झुम मिटिंग कशी घ्यावी, याची माहिती व ज्ञान प्रशिक्षणात देण्यात येते. पाच आॅनलाइन प्रशिक्षण घेण्यासोबतच इंग्रजी विषयातील संशोधनाची त्यांना माहिती, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकविण्याची पद्धतसुद्धा सांगितली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तालुक्यातून इटीएफमध्ये सक्रिय सहभाग घेणाºया नऊ शिक्षकांची सिम्पोझियम(चर्चासत्र) साठी निवड करण्यात येते.
अकोला इटीएफचे ३२५ शिक्षक
अकोला जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून इटीएफचा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात इटीएफचे ३२५ शिक्षक आहेत. यातील निवडक १00 शिक्षकांचा सिम्पोझियम(चर्चासत्र) कार्यक्रम गुरुवारी खंडेलवाल शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, इंग्रजी भाषा विभाग प्रमुख सागर तुपे, विषय सहायक इंग्रजी विभाग संदीप वरणकार प्रामुख्याने उपस्थित होते.