१२०१५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेलाही ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:43 PM2020-03-24T14:43:53+5:302020-03-24T14:44:00+5:30

अकोला जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

12015 Gram Panchayats' election process breaks | १२०१५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेलाही ब्रेक!

१२०१५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेलाही ब्रेक!

Next

अकोला : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जुलै, आॅगस्टमध्ये मुदत संपुष्टात येत असलेल्या राज्यातील १२०१५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागरचना निश्चितीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने आहे तेथेच थांबवली आहे. पुढील आदेशानंतर प्रक्रिया सुरू होईल, असे १७ मार्च रोजीच्या आदेशात आयोगाने म्हटले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
येत्या जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील १२०१५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या तीन टप्प्यांचे काम जानेवारीमध्येच सुरू झाले. सर्वच जिल्ह्यांतील तहसीलदारांनी गुगल मॅपवर तयार केलेले नकाशे अंतिमत: तयार केले. त्यावर प्रभाग पाडण्यात आले. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसह महिलांसाठी राखीव प्रभागाचे आरक्षणही निश्चित करण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेबाबत मतदारांना आक्षेप किंवा हरकत नोंदविण्याची संधी देण्यात आली. तहसील कार्यालयात प्राप्त हरकती, सूचनांवर २९ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेऊन अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे १३ मार्च रोजी सादर करण्यात आला. १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी अंतिम मंजुरी देतील. या टप्प्यापर्यंत प्रक्रिया पोहोचली. त्यानंतर १७ मार्च रोजीच निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींची चालू असलेल्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसोबतच येत्या काळातील मुदती संपणाºया ग्रामपंचायतींची प्रक्रियाही पुढील आदेशापर्यंत थांबवली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम थांबला आहे.

जिल्ह्यातील मुदती संपणाºया ग्रामपंचायती
तालुका              ग्रामपंचायती
अकोला                   ३५
अकोट                    ३८
तेल्हारा                   ३४
मूर्तिजापूर             २९
बाळापूर                ३८
बार्शीटाकळी          २७
पातूर                    २३

 

Web Title: 12015 Gram Panchayats' election process breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.