दुसऱ्या दिवशी १२१ उमेदवारी अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:50+5:302020-12-25T04:15:50+5:30
अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यात १२१ उमेदवारी अर्ज दाखल ...
अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यात १२१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात १२१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या दिवशी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने २४ डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या १३० इतकी झाली आहे.
तालुकानिहाय दाखल
झालेले उमेदवारी अर्ज
तालुका अर्ज
अकोला २३
तेल्हारा ५८
अकोट ०३
मूर्तिजापूर १६
बाळापूर ०३
बार्शिटाकळी ०७
पातूर ११
...............................................
एकूण १२१