तब्बल १२३ रिक्त पदे अन् अतिरिक्त शिक्षक ६३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:08 PM2018-12-04T12:08:34+5:302018-12-04T12:08:49+5:30

या हरकतींवर शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी शिक्षण संस्थाचालकांसमक्ष सुनावणी घेत, आक्षेप असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली.

123 vacancies and additional teachers 63 | तब्बल १२३ रिक्त पदे अन् अतिरिक्त शिक्षक ६३

तब्बल १२३ रिक्त पदे अन् अतिरिक्त शिक्षक ६३

googlenewsNext

- नितीन गव्हाळे

अकोला: अतिरिक्त ठरलेल्या कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये. शिक्षण संस्थेने सेवाज्येष्ठता डावलून शिक्षकाला अतिरिक्त ठरविले असल्यास, त्या शिक्षकाची बाजू ऐकून घेत, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी अतिरिक्त शिक्षकांची कागदपत्रांसह पडताळणी करून अखेर अंतिम अतिरिक्त शिक्षकांच्या आणि रिक्त पदांच्या शाळांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले. आता अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा झाला असून, ४ डिसेंबर रोजी समायोजनाची प्रक्रिया होणार आहे.
गत तीन-चार महिन्यांपासून २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, वर्ग यांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाने बोलाविली. प्राप्त माहितीनुसार सुरुवातीला माध्यमिकचे ६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते आणि १0९ जागा रिक्त असल्याचे समोर आले होते; परंतु अनेक अतिरिक्त शिक्षकांनी आमच्यावर अन्याय झाला असून, संस्थेत सेवाज्येष्ठ असूनही जाणीवपूर्वक संस्थाचालकांनी अतिरिक्त ठरविल्यासंबंधीचे आक्षेप, हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी शिक्षण संस्थाचालकांसमक्ष सुनावणी घेत, आक्षेप असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यात तीन शिक्षकांना न्याय मिळाला. आता अतिरिक्त शिक्षकांची संख्या ६३ वर आली असून, रिक्त पदांचीसुद्धा वाढली आहे. जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल १२३ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. १२३ रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षक ६३ असल्यामुळे या शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर १00 टक्के आरक्षण होणार आहे. मंगळवारी समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने शिक्षकांच्या हृदय धडधडत असून, ग्रामीण की शहरी भागातील शाळा मिळते, याविषयी तर्कवितर्क शिक्षक लढवित आहेत.

आणखी २८ पदे रिक्त आढळली
शिक्षणाधिकाºयांनी संचमान्यतेची पडताळणी केल्यानंतर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये २८ पदे रिक्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिक्त पदांची वाढली आहे.

असे आहेत अतिरिक्त शिक्षक
वर्ग ५ - १३
वर्ग ६ ते ८- ४0
वर्ग ९ ते १0- १0
 

अतिरिक्त शिक्षकांचे १00 टक्के समायोजन होणार आहे. नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. शिक्षकांनी कोणाच्याही आमिषाला, भुलथापांना बळी पडू नये. बळी पडल्यास शिक्षकांचेच आर्थिक नुकसान होईल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प.

 

Web Title: 123 vacancies and additional teachers 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.