शहरात १२४ जणांना काेराेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:20 AM2021-05-20T04:20:20+5:302021-05-20T04:20:20+5:30
९४१ जणांनी केली चाचणी अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून अनेकांना काेराेनाची लागण हाेत आहे. नागरिकांनी लक्षणे आढळून ...
९४१ जणांनी केली चाचणी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून अनेकांना काेराेनाची लागण हाेत आहे. नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तातडीने काेराेना चाचणी करणे अपेक्षित आहे. बुधवारी शहरात ९४१ जणांनी चाचणी केली. यामध्ये २५४ जणांनी आरटीपीसीआर तसेच ६८७ जणांनी रॅपिड अँटीजन चाचणी केली आहे. संबंधितांचे अहवाल तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत़
झाडांच्या फांद्या रस्त्यावर
अकाेला : शहरात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळ-वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समाेर आले. जय हिंद चाैक, हरिहरपेठ, काळा माराेती परिसर यासह मुख्य रस्त्यांलगत वृक्ष काेलमडले. बुधवारी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या वतीने असे वृक्ष बाजूला सारण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी अनेक माेठ्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर कायम असल्याचे चित्र आहे.
विद्युत पुरवठा खंडित
अकाेला : शहरात १८ मे राेजी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे विविध भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. बुधवारी दिवसभर हा पुरवठा सुरळीत हाेऊ शकला नाही. यामध्ये गीतानगर, राहतनगर, पोलीस वसाहत, अकोली बुद्रूक, निसर्ग पार्क, एमराॅल्ड कॉलनी, अकोली खुर्द, जगदंबानगर, मातोश्री कॉलनी, हिंगणा जुना, सोमठाणा आदी भागांचा समावेश आहे. उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
नदी पात्रात जलकुंभी
अकाेला : मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा माेर्णा नदी पात्रात जलकुंभी तयार झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून नदीकाठच्या रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. डासांमुळे नागरिक त्रस्त झाले असून याची दखल घेत मनपा प्रशासनाने नदीपात्रात तातडीने फवारणी करावी तसेच जलकुंभी काढावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक गिरीश जाेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
अकाेला : शहरात १८ मे राेजी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. बुधवारी आ. गोवर्धन शर्मा यांनी माळीपुरा, अकोट फैल, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, कमला नेहरू नगर, अनिकट, राधाकिसन प्लॉट, रिझर्व माता, पोळा चौक, पोलीस लाइन, आंबेडकर नगर या भागांची पाहणी केली.