नऊ वर्षांत १.२५ कोटी वाहनांची भर
By admin | Published: December 4, 2014 12:42 AM2014-12-04T00:42:37+5:302014-12-04T00:42:37+5:30
वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले.
नीलेश शहाकार/बुलडाणा
राज्यातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची डोकेदुखी, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गत नऊ वर्षांत तब्बल १ कोटी २५ लाख वाहनांची भर राज्यातील रस्त्यांवर पडल्याचे महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद आहे.
दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा आसनी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचेही प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २0१४ मध्ये राज्यात ६१ हजार ८८३ रस्ते अपघात झाले. साधारण नऊ वर्षांपूर्वी हीच आकडेवारी १0 हजारांनी कमी होती. वाढलेली वाहने आणि वाहनचालकांचा हलगर्जी ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. २00६ साली ९९ लाख ३५ हजार ९६५ वाहने रस्त्यावर धावत होती. २0१४ साली वाहनांची संख्या २ कोटी २५ लाखापर्यंत पोहोचली. या आठ वर्षात जवळपास १ कोटी २५ लाख ६४ हजार ३५ वाहनांची भर पडली.
राज्यातील वाहनांची संख्या
वर्ष वाहने
२00६ ९९,३५,९६५
२00७ १,0९,६६,४३४
२00८ १,२१,७0,९९१
२00९ १,३३,३५,३६१
२0१0 १,४४,५0,९0८
२0११ १,५७,६८,४२१
२0१२ १,७४,३४,0९९
२0१३ १,९४,३२,000
२0१४ २,२५,00,000