अकोला जिल्हय़ात वर्षभरात आढळले १२५६ क्षयरुग्ण

By admin | Published: March 24, 2015 12:36 AM2015-03-24T00:36:57+5:302015-03-24T00:36:57+5:30

८५ टक्के रुग्ण औषधोपचाराने बरे.

1256 tuberculosis detected in Akola district during the year | अकोला जिल्हय़ात वर्षभरात आढळले १२५६ क्षयरुग्ण

अकोला जिल्हय़ात वर्षभरात आढळले १२५६ क्षयरुग्ण

Next

सचिन राऊत /अकोला: सार्वजनिक आरोग्याची क्षयरोग ही गंभीर समस्या निर्माण झाली असून, दिवसेंदिवस क्षयरोगींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. जिल्हय़ात जानेवारी २0१४ ते १ जानेवारी २0१५ या एका वर्षाच्या कालावधीत सुमारे १ हजार २५६ क्षयरुग्ण आढळले असून, यामधील ८५ टक्के रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत. १५ टक्के रुग्णांनी औषधोपचाराकडे दुर्लक्ष केल्याने ते डिफॉल्टर क्षयरोगी असून, त्यामधील काही जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि तेवढय़ाच झपाट्याने वाढणार्‍या क्षयरोगाची लागण जिल्हय़ातील १ हजार २५६ जणांना झाली असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या पथकाने शहरासह जिल्हय़ात जानेवारी २0१४ ते जानेवारी २0१५ या कालावधीत रुग्णांची तपासणी केली आहे. यामध्ये कॅट १ म्हणजेच प्रथम स्तरावर असलेल्या क्षयरुग्णांची संख्या ९८७ असून, या रुग्णांनी डॉटस या पद्धतीचा नियमित उपचार घेतल्यामुळे ते ठिक झाले आहेत. कॅट टू या प्रकारातील २५१ रुग्ण आढळले असून, कॅट ४ (एमडीआर) आणि सर्वात घातक असलेल्या कॅट ५ म्हणजेच एक्सडीआर टीबीचा एका वर्षात एक रुग्ण आढळला आहे. जिल्हय़ात एकूण १ हजार २५६ क्षयरुग्ण आढळले असून, योग्य औषधोपचाराने यापैकी तब्बल ८५ टक्के रुग्ण ठणठणीत झाले आहेत.

Web Title: 1256 tuberculosis detected in Akola district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.