अकोला जिल्ह्यात १२.७२ गरिबांना मिळाले मोफत धान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 11:09 AM2020-12-19T11:09:59+5:302020-12-19T11:10:21+5:30
Akola News १२ लाख ७२ हजार ६१० गरीब लाभार्थींना नोव्हेंबरअखेरपर्यंत मोफत धान्याचा लाभ मिळाला.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक १२ लाख ७२ हजार ६१० गरीब लाभार्थींना नोव्हेंबरअखेरपर्यंत मोफत धान्याचा लाभ मिळाला. त्यामुळे कोरोना काळात गरीब कल्याण योजना गरिबांसाठी आधार ठरली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गत एप्रिलपासून प्राधान्य गट व अंत्योदय अन्नयोजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्तभाव दुकानांमधून मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये गत एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्नयोजनेतील १२ लाख ७२ हजार ६१० शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. एप्रिल ते नोव्हेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक गरीब लाभार्थींना ४ लाख ५९ हजार ६६५ क्विंटल धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांसाठी गरीब कल्याण योजना आधार ठरली आहे. मोफत धान्य वाटपाची मुदत नोव्हेंबरअखेर संपली असून, डिसेंबरअखेरपर्यंत मोफत धान्य वाटप करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार गरीब शिधापत्रिकाधारकांना डिसेंबरअखेरपर्यंत मोफत धान्य मिळणार असले तरी, पुढे काय? असा प्रश्न शिधापत्रिकाधारक गरीब लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे.
धान्याचा लाभ मिळालेले तालुकानिहाय लाभार्थी
अकोला शहर : १९८९३१
अकोला ग्रामीण : २२५२५७
बार्शीटाकळी : १३३१३७
अकोट : १५८८७३
तेल्हारा : १३७६५९
बाळापूर : १६०२६३
पातूर : ११२२५६
मूर्तिजापूर : १४६२३४
४.५९ क्विंटल धान्याचे वितरण !
एप्रिल ते नोव्हेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १२ लाख ७२ हजार ६१० गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ४ लाख ५९ हजार ६६५ क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले.
उद्योगधंदे बंद; आता पोटाची चिंता !
‘लाकडाऊन’ संपला असला तरी, अर्थव्यवस्था अद्याप पूर्णत: पूर्वपदावर आली नाही. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद असून, रोजगार मिळत नाही. अशा स्थितीत दरमहा मिळत असलेले मोफत धान्य बंद झाल्यानंतर पोट कसे भरणार, याबाबतची चिंता गरीब शिधापत्रिकाधारकांना सतावत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकाधारक १२ लाख ७२ हजार ६१० लाभार्थींना एप्रिल ते नोव्हेंबरअखेरपर्यंत ४ लाख ५९ हजार ६६५ क्विंटल धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. डिसेंबरअखेरपर्यंत मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.
- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी