बारावी परीक्षेत दोन कॉपीबहाद्दर निलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:22 PM2019-02-22T13:22:15+5:302019-02-22T13:22:23+5:30
अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या.
अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या. या धाडीत पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील आणि अकोट येथील नरसिंग महाविद्यालयातील प्रत्येक एक अशा दोन कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. भरारी पथकाने दोघांना निलंबित केले.
बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, परीक्षा जिल्ह्यातून २६ हजार ९२0 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील ८३ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षा केंद्र आणि परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने व्हिडिओ शुटिंग पथकांसह भरारी पथके नियुक्त केले आहेत. महिला भरारी पथकाने अधिव्याख्याता कविता बोरसे यांच्या नेतृत्वात अकोट येथील नरसिंग महाविद्यालयात धाड घातली. या ठिकाणी एका विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडले. तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वातील जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या पथकाने पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात धाड घालून एका विद्यार्थ्याने कॉपी केल्यामुळे निलंबित केले. २२ फेब्रुवारीला हिंदी विषयाचा पेपर होणार आहे.
अर्धा तास आधी न आल्यास पेपर नाही!
परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टिकोनातूनच १0.३0 वाजतानंतर परीक्षा केंद्रावर येणाºया विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी व पालकांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. सकाळी ११ ते २ या वेळत पेपर होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी केले आहे.