जिल्हय़ातील १३ ठाणेदारांच्या बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:08 AM2017-08-11T02:08:57+5:302017-08-11T02:08:57+5:30
अकोला : जिल्हा पोलीस दलातील तब्बल १३ पोलीस अधिकार्यांची खांदेपालट गुरुवारी करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बदल्यांचा आदेश दिला असून, बर्याच कालावधीनंतर पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा पोलीस दलातील तब्बल १३ पोलीस अधिकार्यांची खांदेपालट गुरुवारी करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बदल्यांचा आदेश दिला असून, बर्याच कालावधीनंतर पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळात सुरू आहे.
अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांची पदोन्नती झाल्यामुळे संवेदनशिल असलेल्या अकोट शहरची मोठी जबाबदारी खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्यावर देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातून आलेले व अभ्यासपूर्ण पोलिसिंगसाठी नाव असलेले संतोष महल्ले यांच्यावर खदान पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. जुने शहरचे ठाणेदार गणेश अणे यांचा आर्थिक गुन्हे शाखेत चांगला अभ्यास असल्याने त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जुने शहर पोलीस स्टेशनचा अभ्यास असलेल्या विनोद ठाकरे यांच्याकडे जुने शहर पोलीस स्टेशनचा कारभार देण्यात आला आहे. अकोट ग्रामीणचे ठाणेदार पी. जे. अब्दागिरे यांना पोलीस कल्याण देण्यात आले असून, मानाचे ठाणेदार व पदोन्नती झालेले मिलिंद बाहाकार यांना अकोट ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख देवराव खंडेराव यांना पातूर पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. तेल्हार्याचे ठाणेदार अनिल ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, सचिंद्र शिंदे यांना तेल्हारा ठाणेदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष शाखेची जबाबदारी दत्तात्रय आव्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विकास देवरे यांची हिवरखेड ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली असून, जुने शहरचे भाऊराव घुगे यांना माना पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. विशाल नांदे यांची सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी, तर नंदकिशोर नागलकर यांची जुने शहर पोलीस स्टेशनला दुय्यम अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर एवढय़ा पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आता कामाचा धडाका सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.