१३ ग्रामपंचायतींचे १५४ सदस्य झाले बाद !

By admin | Published: September 1, 2016 02:47 AM2016-09-01T02:47:32+5:302016-09-01T02:47:32+5:30

अकोला महानगरपालिका हद्दवाढीचा बसला फटका

13 gram panchayat members after 154 members! | १३ ग्रामपंचायतींचे १५४ सदस्य झाले बाद !

१३ ग्रामपंचायतींचे १५४ सदस्य झाले बाद !

Next

संतोष येलकर
अकोला, दि. ३१: महानगरपालिका हद्दवाढीत शहरानजिकची २४ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामध्ये हद्दवाढीत पूर्णत: क्षेत्र गेलेल्या १३ ग्रामपंचायती जिल्ह्यातून बाद करण्यात आल्याने, या ग्रामपंचायतींच्या १५४ सदस्यांचे सदस्यत्वही गेले आहे.
अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात येत असल्याची अधिसूचना मंगळवारी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. मनपाच्या हद्दवाढीत २४ गावे समाविष्ट करण्यात आली. हद्दवाढीत समाविष्ट गावांचे क्षेत्र जिल्ह्यातून वगळण्यात आले. त्यामध्ये हद्दवाढीत पूर्ण क्षेत्र समाविष्ट करण्यात आलेल्या १३ ग्रामपंचायती बाद झाल्या. ग्रामपंचायतींचे क्षेत्र हद्दवाढीत गेल्याने, संबंधित १३ ग्रामपंचायतींच्या १५४ सदस्यांचे सदस्यत्वही गेले आहे. त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांचे पदही गेले आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दवाढीचा ग्रामपंचायतींच्या सदस्यांना फटका बसला आहे.


या आहेत बाद झालेल्या ग्रामपंचायती!
१) अकोली खुर्द २) हिंगणा ३) शिवर ४)मलकापूर ५) शिवापूर ६: डाबकी ७) सोमठाणा ८) गुडधी ९) उमरी १0) शिवणी ११) खरप बु. १२) शिलोडा १३) खडकी बु.

ग्रामपंचायत कर्मचा-यांना सामावून घेणार मनपात!
मनपा हद्दवाढीत १३ ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समावून घेण्यात येणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच जिल्हा परिषद आणि मनपा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.


अकोला पंचायत समितीचे सदस्य संख्याबळ झाले २४!
अकोला पंचायत समितीच्या खडकी बु. मलकापूर भाग-२, उमरी प्र.बाळापूर आणि शिवणी या चार गणांचे क्षेत्र पूर्णत: मनपा हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अकोला पंचायत समितीचे सभापती तथा उमरी प्र.बाळापूर गणाचे सदस्य अरुण परोडकर, उपसभापती तथा खडकी बु. गणाचे सदस्य गणेश अंधारे, मलकापूर भाग-२ गणाचे सदस्य विशाल पाखरे आणि शिवणी गणाचे सदस्य विलास जगताप इत्यादी चार सदस्यांना ३0 ऑगस्टपासून सदस्य पदावरुन दूर करण्यात आले आहे. चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, एकूण २८ सदस्य संख्या असलेल्या अकोला पंचायत समितीचे सदस्य संख्याबळ आता २४ झाले आहे.


ग्रामपंचायतींचे खाते गोठविण्याचा आदेश!
मनपा हद्दवाढमध्ये समाविष्ट १३ ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहाराचे बँक खाते पुढील आदेशापर्यंत गोठविण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी बुधवारी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिला. त्यानुसार मनपा हद्दवाढीत समाविष्ट संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतनिहाय बाद झालेल्या सदस्यांची संख्या
अकोली खुर्द 0७, हिंगणा 0७, सोमठाणा 0७, शिवणी १७, शिवर १५, मलकापूर १७, शिवापूर 0७, डाबकी 0७, गुडधी १३, उमरी १८, खरप बु. १५, शिलोडा 0९, खडकी बु. १५. एकूण -१५४

Web Title: 13 gram panchayat members after 154 members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.