अकोल्यात कोरोनाचे आणखी १३ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या १८४१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:15 AM2020-07-10T11:15:19+5:302020-07-10T11:16:59+5:30
आतापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या १८४१ वर गेली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असले, तरी अकोल्यात दिवसेंदिवस या संसर्गजन्य आजाराची व्याप्ती वाढतच आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी जिल्हाभरात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या १८४१ वर गेली आहे. आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३८१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी २१० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शीटाकळी, दोन कृषिनगर-अकोला, तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.