लिज संपण्यासाठी आणखी १३ वर्षे बाकी; घरांचा इ-लिलाव कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:46+5:302021-09-22T04:22:46+5:30

तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने सेवारत कर्मचाऱ्यांच्या साेयीसाठी सन १९७४ मध्ये गाेरक्षण राेड परिसरातील १११ भूखंड लिज पट्टयावर दिले हाेते. ...

13 more years left until lease expires; How to e-auction houses? | लिज संपण्यासाठी आणखी १३ वर्षे बाकी; घरांचा इ-लिलाव कसा?

लिज संपण्यासाठी आणखी १३ वर्षे बाकी; घरांचा इ-लिलाव कसा?

Next

तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने सेवारत कर्मचाऱ्यांच्या साेयीसाठी सन १९७४ मध्ये गाेरक्षण राेड परिसरातील १११ भूखंड लिज पट्टयावर दिले हाेते. त्यासाठी अकाेला नगरपालिका कर्मचारी वर्ग-३ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.अकाेला या संस्थेसाेबत रितसर ३० वर्षांच्या लिजची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली हाेती. या भूखंडांवर तत्कालीन कर्मचाऱ्यांनी घामाच्या पैशातून स्वप्नातील घरे उभारली. त्याबदल्यात महापालिकेकडे नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी व वार्षिक भाडे सुध्दा वेळावेळी जमा केले. दरम्यान, गृहनिर्माण संस्थेची २००४ मध्ये ३० वर्षांची लिज संपुष्टात आल्यानंतर २० फेब्रुवारी २००९ राेजीच्या सर्वसाधारण सभेत गृहनिर्माण संस्थेला पुन्हा ३० वर्षांची लिज वाढवून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला हाेता. ही लिज संपण्यासाठी आणखी १३ वर्षांची मुदत बाकी असताना सदर भूखंड भाडेपट्ट्याने देण्याच्या उद्देशातून महापालिकेने इ-लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

...तर अनेकांना व्हावे लागेल बेघर

मनपा प्रशासनाने १११ भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यासाठी इ-लिलाव प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया १३ ऑक्टाेबर राेजी पार पडेल. दरम्यान, आजराेजी या भूखंडावर बांधण्यात आलेल्या घरांमध्ये राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी वयाेवृध्द झाले आहेत. इ-लिलाव प्रक्रिया राबवल्यास व इच्छुकांनी ज्यादा रक्कमेची बाेली लावल्यास वयाेवृध्द कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह बेघर व्हावे लागणार आहे.

सत्ताधारी भाजपसह सेना,काॅंग्रेसकडे लक्ष

महापालिकेने प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या नगर परिषद काॅलनीतील भूखंडधारकांना वाढवून दिलेल्या लिजची मुदत २०३४ मध्ये संपुष्टात येइल. अशास्थितीत प्रशासनाने इ-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, प्रभागात भाजप नगरसेवकांचा बाेलबाला असून या संदर्भात सत्ताधारी भाजपसह विराेधी पक्ष शिवसेना व काॅंग्रेस काेणता ताेडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 13 more years left until lease expires; How to e-auction houses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.