१३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 02:51 PM2019-09-03T14:51:46+5:302019-09-03T14:52:27+5:30
१३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
अकोला: ‘एनसीआरटी’ नवी दिल्लीच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून ३१ विद्यार्थी दुसºया टप्प्याच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या दुसºया टप्प्याच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सोमवारी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पार पडला. विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कौतुक केले.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनीचा अथर्व देवेंद्र ताले, कोठारी कॉन्व्हेंटची रसिका दिनेश मल, नोएल सीबीएससी स्कूलचा रोहन दत्तात्रय कवळे, तुषार भारत कराळे, माऊंट कारमेलची भ्रुगीश मेहुल वोरा, प्रभात किड्स स्कूलचा पार्थ शैलेश नावकार, कीर्ती चंद्रशेखर सावरकर, बालशिवाजी शाळेचा हर्षल अमर गजभिये, प्रज्वल जगन्नाथ घोगले, स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा येथील रसिका ज्ञानेश्वर कपले, अनिकेत सुनील इंगळे, विराज राजू जगताप आणि फ्रिडम इंग्लिश स्कूल अकोटचा पार्थ दीपक वर्मा यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना इ. अकरावी व बारावीमध्ये दरमहा १२५0 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत व पदव्युत्तर पदवीपर्यंत दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच पीएचडीसाठी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी दिली. कौतुक सोहळ्याला न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य माधव मुन्शी, शशिकांत बांगर व अनिल जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)