हातरुण येथे १३० नागरिकांचे लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:36+5:302021-05-09T04:19:36+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण शासनाने सुरू केले आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावात ...
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण शासनाने सुरू केले आहे. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावात आरोग्य सेवा पुरवली जाते. हातरुण आरोग्य केंद्रांतर्गत गावागावात जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे पालन आणि सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ गावंडे यांनी केली आहे.
हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रात १३० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भुस्कुटे, आरोग्य पर्यवेक्षक गुलवाडे, आरोग्य सेवक डाबेराव, आरोग्य सेवक दांदळे, आरोग्य सेविका गावंडे, आरोग्य सेविका महाजन, आरोग्य सेविका वेले, आरोग्य सेविका भावना चौधरी यावेळी उपस्थित होत्या.
‘घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवा!’
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्र कमी प्रमाणात असून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आजूबाजूच्या गावात जावे लागते. यासाठी प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक गावातील बसफेरी सध्या बंद आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी केली आहे.