सीबीएसईचे १३०० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:17 AM2021-04-18T04:17:50+5:302021-04-18T04:17:50+5:30

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार? सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, ...

1300 CBSE students pass without taking exams! | सीबीएसईचे १३०० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

सीबीएसईचे १३०० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

Next

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना गुण कोणत्या आधारावर देण्यात येतील. गुण कमी मिळाले तर इयत्ता अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश कसा घ्यायचा. याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी गुणांचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार केला जातो. गुण चांगले मिळाले तर प्रवेशाचा मार्ग मोकळा होता. या गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको. असे पालकांचे म्हणणे आहे.

गुणदान समपातळीवर कशी आणणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणदान पद्धत कशी राबविणार. गुणदान समपातळीवर कसे आणणार. याबाबत पालक, शिक्षकांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु, याबाबत केंद्रीय माध्यमिक बोर्डाकडून शाळांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे संभ्रम वाढत आहे.

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व शाळेत झालेल्या परीक्षांच्या आधारे मिळालेले गुण सीबीएसई बोर्डाला पाठविण्यात येणार आहेत. त्या आधारे बोर्डाकडून निकाल घोषित होईल. परंतु, यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-शशीकांत कुळकर्णी, प्राचार्य, ज्युबिली सीबीएसई स्कूल

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व शाळांतर्गंत परीक्षेच्या आधारे गुण देऊन निकाल घोषित करण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत बोर्डाकडून सूचना आल्या नाहीत. बोर्डाने ऑनलाईन एकच प्रवेश परीक्षा घेऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध कराव्यात.

-अनोष मनवर, प्राचार्य, नोएल सीबीएसई स्कूल

पालक काय म्हणतात...

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. परीक्षा घ्यायलाच हवी. परीक्षा न घेता, पास करणे योग्य नाही. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. जे पास होणारे विद्यार्थी नाहीत. तेही आता पास होतील. पहिल्या क्रमांकात पास होणारा आणि द्वितीय श्रेणीत पास होणारा विद्यार्थी एकाच रांगेत आले आहेत.

-सचिन अग्रवाल, पालक

परीक्षा होईल. म्हणून मुलांनी वर्षभर केला. परंतु, परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे टेन्शनच गेले आहे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. बोर्डाकडून गुण कोणत्या पद्धतीने देण्यात येतील. गुण चांगले मिळतील का? असे प्रश्न सतावत आहेत.

-संजीव अघडते, पालक

Web Title: 1300 CBSE students pass without taking exams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.