संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:36 AM2021-05-04T10:36:23+5:302021-05-04T10:38:26+5:30

Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली.

13,000 positives during curfew; Even after 15 days, the number of patients did not decrease | संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

Next
ठळक मुद्देमहिनाभरात २६० जणांचा मृत्यू रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली, मात्र संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १३ हजार ६२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर २६० जणांचा मृत्यू झाला. या चिंताजनक परिस्थितीत गत १५ दिवसात रुग्ण रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे १३ हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला. दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असून, सुमारे दहापेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्याची स्थिती अकोलेकरांसाठी चिंताजनक आहे, मात्र मागील १५ दिवसात जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८ टक्क्यांनी सुधारला आहे. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गत १५ दिवसात ७ हजार ५२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५

पॉझिटिव्ह - ४,४७१

रुग्णालयातून सुटी - ६,१०१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.९१

रिकव्हरी रेट - ७९.०२

 

१५ एप्रिल ते ३ मे एकूण चाचण्या - ३२,६४१

पॉझिटिव्ह - ९, १५१

रुग्णालयातून सुटी - ७,५२१

 

पॉझिटिव्हिटी रेट - २८.०३

रिकव्हरी रेट - ८७.०२

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

बंदीनंतरही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असून मास्कचा वापर टाळत आहेत. सकाळी ११ वाजता पर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

लक्षणे दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करीत असून, चाचणीला घाबरत आहेत. घरीच उपचाराला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीतही लोक स्वत:चे विलगीकरण करुन घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग वाढत आहे.

तरुण वर्ग विनाकारण किंवा कामानिमित्त घराबाहेर पडतो. बाहेरून आल्यानंतर योग्य काळजी न घेताच ते इतरांच्या संपर्कात येतात. या प्रकारामुळे घरात राहूनही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात सर्वत्रच चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दिसल्यावर त्यांना शहरात जावे लागते.

किरकोळ लक्षणे निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण घरगुती उपाययोजना करतात.

त्याचा काहीच फरक न पडल्यास शहरात डॉक्टरांकडे तीन ते चार दिवस उपचार घेतात. त्यानंतर बरे न वाटल्यास रुग्ण कोरोना चाचणी करतात.

या काळात कोविडचा रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो.

Web Title: 13,000 positives during curfew; Even after 15 days, the number of patients did not decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.