वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता १३२ पोलीस ठाणी!

By atul.jaiswal | Published: March 7, 2018 01:52 PM2018-03-07T13:52:39+5:302018-03-07T13:56:22+5:30

अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

132 police stations in the state to file electricity theft! | वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता १३२ पोलीस ठाणी!

वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता १३२ पोलीस ठाणी!

Next
ठळक मुद्देया १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील वीज चोरीच्या प्रकरणांसाठी आठ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.

अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी ५१ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.
यासंदर्भातील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे सहा पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहेत. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड जिल्ह्यात ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे जिल्ह्यात ३, हिंगोलीत ३, नांदेड जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, नाशिक जिल्ह्यात ५, जालन्यात ३, परभणी जिल्ह्यात ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.
पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलडाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया जिल्ह्यात ३, जळगाव जिल्ह्यात ४, कोल्हापूर जिल्ह्यात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३, सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

अकोला परिमंडळात आठ पोलीस ठाणी
महावितरणच्या अकोला परिमंडळात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील वीज चोरीच्या प्रकरणांसाठी आठ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट फैल, बाळापूर आणि अकोट ही पोलीस ठाणी आहेत. बुलडाण्यात बुलडाणा शहर आणि खामगाव ही पोलीस ठाणी, तर वाशिम जिल्ह्यासाठी वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा येथील पोलीस ठाणी निवडण्यात आली आहेत.

वीज चोरीची प्रकरणे दाखल करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस ठाणी उपलब्ध झाल्यामुळे या प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया गतिमान होईल. त्यामुळे वीज चोरट्यांमध्ये वचक निर्माण होऊन, वीज चोरीला आळा बसेल.

- अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, अकोला परिमंडळ, महावितरण.

 

Web Title: 132 police stations in the state to file electricity theft!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.