अकोला जिल्ह्यात १३.३९ कोटींची घरपट्टी थकीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:36 PM2020-09-28T12:36:54+5:302020-09-28T12:37:34+5:30
वसुलीच्या कामाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून कानाडोळा करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅगस्ट अखेरपर्यंत १३ कोटी ३९ लाख ३७ हजार ८४३ रुपयांचा घर कर (घरपट्टी) थकीत असल्याने, घरपट्टी वसुलीच्या कामाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा इत्यादी सात तालुक्यात ५३५ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये घर कर (घरपट्टी) वसूल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींकडून घरपट्टी वसूल करण्यात येते; परंतु आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ कोटी ३९ लाख ३७ हजार ८४३ रुपये घर कर थकीत असल्याने, घरपट्टी वसुलीच्या कामाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून कानाडोळा करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून घरपट्टी वसूल करण्याच्या कामाला तेव्हा गती प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुकानिहाय घरपट्टीची अशी आहे थकबाकी!
तालुका रक्कम
अकोला ४,०७,२३,९६७
अकोट १,९१,५८,६८७
बाळापूर १,३८,७९,७८४
बार्शीटाकळी १,८२,२६,१५१
मूर्तिजापूर १,२४,९९,५४९
पातूर १,४२,२७,४७९
तेल्हारा १,५२,२२,२२६
..........................................
एकूण १३,३९,३७,८४३