१३४ वीज ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:03 PM2017-09-04T20:03:55+5:302017-09-04T20:06:46+5:30
अकोला: महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागामध्ये ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासाठी, वीज बिल दुरुस्ती व विविध तक्रारी व समस्या निवारणासाठी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये तीनही विभागामध्ये एकूण २६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १३४ तक्रारींचे जागेवरच निरसन करण्यात येऊन वीज ग्राहकांचे समाधान करण्यात आले, तर उर्वरित तक्रारींचे ठरावीक मुदतीत निराकरण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला मंडळातील उपविभागनिहाय अकोला ग्रामीण, पातूर, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा येथे, तर अकोला शहरातील सर्व उपविभागाचे विद्युत भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे हे शिबिर सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अकोला शहर विभागामध्ये प्राप्त ९६ तक्रारींपैकी २0, अकोट विभागामध्ये ३४ तक्रारींपैकी १२, तर अकोला ग्रामीण विभागांमध्ये १३६ तक्रारीपैकी १0२ तक्रारींचे जागेवरच निरसन करण्यात आले. ग्राहकांशी सुसंवाद साधत विविध योजनांची व सेवेची माहिती त्यांना यावेळी देण्यात येऊन समाधान करण्यात आले.
विद्युत भवन येथील शहर विभागाच्या शिबिराचे फित का पून उद्घाटन विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य किशोर पाटील मानकर यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर, विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य संजय देशमुख व राजीव थोरवे, अतिरिक्त कार्यकारी अभियंते गणेश महाजन, प्रदीप घोरुडे, संजीव राठोड, ए. जे. दिनोरे यांच्यासह अभियंते, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. अकोट व अकोला ग्रामीण विभागामधील उपविभागामध्ये आयोजित शिबिरामध्ये कार्यकारी अभियंते प्रमोद काकडे व देवेंद्र उंबरकर यांच्यासह उपकार्यकारी अभियंते, कर्मचारी व ग्राहक उ पस्थित होते.
वीज ग्राहकांच्या नवीन वीज जोडणी, नावात-पत्त्यात बदल, सदोष किंवा चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती व इतर तक्रारी प्राप्त आल्या.. नवीन वीज जोडणी व इतर अर्जाच्या मंजुरीची व वीजसेवेविषयक तक्रारी निरसनची प्रक्रिया जागेवरच करण्यात आली.. या अभियानास वीज ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.