कोपर्डीतील भगिनीसाठी १३ ला कॅन्डल मार्च!

By Admin | Published: July 13, 2017 01:52 AM2017-07-13T01:52:42+5:302017-07-13T01:52:42+5:30

अकोला: १३ जुलै रोजी कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह अकोल्यात कँडल मार्च आयोजित करण्याचा निर्णय सकल मराठा समाज अकोला जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला

13th candle march for Kopardi's sister! | कोपर्डीतील भगिनीसाठी १३ ला कॅन्डल मार्च!

कोपर्डीतील भगिनीसाठी १३ ला कॅन्डल मार्च!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला. लाखो लोक सद्भावनेने रस्त्यावर उतरले; पण त्या मुलीला अजूनही न्याय आणि दोषींना शिक्षा होऊ शकली नाही. कोपर्डीनंतर अशा घटना वाढत राहिल्या; पण सरकारच्या डोळ्यावरची झापड काही केल्या उघडेना. त्यामुळे १३ जुलै रोजी कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह अकोल्यात कँडल मार्च आयोजित करण्याचा निर्णय सकल मराठा समाज अकोला जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
अकोल्यातील बसस्टँडजवळील गांधी जवाहर पार्क ते सिटी कोतवालीस्थित महाराणा प्रताप बाग असा हा कँडल मार्चचा मार्ग असून, गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा समाजबांधव, महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सामील होणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली.

Web Title: 13th candle march for Kopardi's sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.