दोन अट्टल चोरट्यांकडून १४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:02+5:302021-05-31T04:15:02+5:30
अकोला : महानगरपालिकेसमोरून एक दुचाकी चोरी गेल्यानंतर संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी ...
अकोला : महानगरपालिकेसमोरून एक दुचाकी चोरी गेल्यानंतर संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या दोन अट्टल चोरट्यांनी रामदासपेठ व सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १४ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. यावरून पोलिसांनी या दोन चोरट्यांकडून तब्बल १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
खोलेश्वर येथील रहिवासी नितेश शंकर धायडे (३०) यांची एमएच ३० एजे ७३७ क्रमांकाची दुचाकी महानगरपालिकेजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरली होती. याप्रकरणी त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून २९ मे रोजी पोलिसांनी अकोट फाइलातील संजय नगर येथील रहिवासी शेख नफीस शेख गफूर (२८) व सय्यद फयूम सय्यद कयूम (२०) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ गुन्हे केल्याची माहिती दिली तर रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने या दोन चोरट्यांकडून तब्बल १४ दुचाकी जप्त केल्या असून या दुचाकी सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर त्या दोन्ही चोरट्यांना पुढील तपासासाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, संदीप काटकर, विशाल मोरे, शंकर डाबेराव, लीलाधर खंडारे, रवी पालीवाल, अनिल राठोड, प्रवीण कश्यप, सतीश गुप्ता, रोशन पटले, सुशील खंडारे यांनी केली.
===Photopath===
300521\img-20210530-wa0023.jpg
===Caption===
???? ???????? ?????? ? ?????