१४ कोटी ३१ लाख रुपयांचे कीटकनाशके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:09 PM2017-10-10T19:09:48+5:302017-10-10T20:18:58+5:30

अकोला : जीवितास हानिकारक, विनापरवाना साठवून ठेवलेले  १४ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे १ लाख २0 हजार लीटर (१२0.२९ मे.टन) कीटकनाशके कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केले.  जम्मू काश्मीर, दिल्ली ते गुजरात असे देशातील अनेक राज्यांतील कंपन्यांची कीटकनाशके येथे सापडली. संपूर्ण राज्यात येथून कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित झाले आहे.

14 crore 31 lakh rupees pesticide seized | १४ कोटी ३१ लाख रुपयांचे कीटकनाशके जप्त

१४ कोटी ३१ लाख रुपयांचे कीटकनाशके जप्त

Next
ठळक मुद्दे‘मृत्यू‘ची फवारणीदेशातील कीटकनाशके विक्रीचे मोठे केंद्र

राजरत्न सिरसाट 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जीवितास हानिकारक, विनापरवाना साठवून ठेवलेले  १४ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे १ लाख २0 हजार लीटर (१२0.२९ मे.टन) कीटकनाशके कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केले.  जम्मू काश्मीर, दिल्ली ते गुजरात असे देशातील अनेक राज्यांतील कंपन्यांची कीटकनाशके येथे सापडली. संपूर्ण राज्यात येथून कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित झाले आहे.
भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत येथील औद्योगिक वसाहतीतील गोदामातून  जीवितास हानिकारक, नोंदणीच केली नसलेले, विनापरवाना जहाल कीटकनाशक मोनोक्रोटोफास्ट, प्रोफेनोफॉस, फिफ्रोनील, डायफे थीरोयन, अँसीफेट, सायरोमेसीफेन जप्त करण्यात आले असून, या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. येथे पीक संजीवकेही आढळून आलीत. हय़ुमिक अँसिड, सी वीड, फॉलिक अँसिड, हेक्साकोनॅझोल, झिंथ तसेच फेनफ्राक्झिमेट, प्युरीप्रोफेन, बिसपॅरीबॅक सोडीएम, अँझोक्सिस्ट्रोबीन, थायमेफोक्झोन, थिमॅफोक्साम, अँबामेथिन अशी अनेक प्रकारची कीटकनाशके , संजीवके आढळून आली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक ए.जी. वाघमारे, जे.आर. टेकाळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, मोहीम अधिकारी अरुण गावंडे, उपविभागीय कृषी अधिकारी ए.डी. कुळकर्णी, तंत्र अधिकारी के. एस. जाधव,वी.सी. मोरे, व्ही.आर. धुमाळे, व्ही.आर. धुळे, डॉ. जुमडे यांनी केली.

देशातील कीटकनाशक कंपन्या!
परिजात इंडस्ट्रीजची जीवितास हानिकारक तसेच विनापरवाना, नोंद नसलेले कीटकनाशक पथकाने जप्त केले. कृषी रसायन एक्सपोर्ट कंपनीकडे जीविजास हानिकारक कीटकनाशकांचा परवाना नाही, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रा.लि. आझादपूर, दिल्ली या कंपनीचे विनापरवाना कीटकनाशके जप्त करू न विक्रीस बंदी टाकण्यात आली. घरडा केमिकल्स लि. सांबा (जम्मू काश्मीर) या कंपनीचे जीवितास हानिकारक कीटकनाशके जप्त केली. मे.फायटोमेक इंडिया लि. मेडक, आंध्र प्रदेश कंपनीच्या कीटकनाशकांची भरारी पथकाला नोंद रजिस्टरमध्ये नोंद आढळली नाही. मे. जयलक्ष्मी इंडस्ट्रीज या गुजरातच्या कंपनीकडे साठा पुस्तके अपूर्ण आढळली. सिजेंटा इंडिया लि.ची जीवितास हानिकारक कीटकनाशके आढळून आली. एम.एफ.सी. इंडिया प्रा.लि.ची कीटकनाशके विनानोंदणीचीच विक्री सुरू  होती. शिवालिक क्रॉपसान्सेच कंपनीची जीवितास हानिकारक कीटकनाशके आढळली. सल्फर मिल्स लिमिटेडचीही जीवितास हानिकारक कीटकनाशके भरारी पथकाला आढळून आली. अकोला औद्योगिक वसाहतीमधून या विक्रेत्यांचा गोदामातून ही कीटकनाशके जप्त करण्यात आली. परिजात, कृषी रसायन, एमएफसी, शिवालिक, सल्फर, क्रिस्टल, घरडा या कंपन्यांवर आवश्यकतेनुसार कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

गुजरातचे मोनोक्रोटोफास्ट जप्त!
गुजरात इेन्सेकटीसाइड कंपनीच्या गोदामातून अत्यंत जहाल मोनोक्रोटोफास्ट इतर कीटकनाशके जप्त करू न त्यावर विक्रीची बंदी टाकण्यात आली. बायर इंडियाचे फिप्रोनिल व इतर कीटकनाशके आढळून आली. बायोस्टँड कंपनीची प्रोफेनोफॉस सायपरमेथिन, डायकेथोरॉन कीटकनाशके जप्त करण्यात आली. 

दोन दिवस कारवाई 
कृषी विभागाच्या भरारी पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने रविवार व सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू 
जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात २७ च्यावर शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेच्यावर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. यातील अनेक जणांची दृष्टी गेली आहे. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक २0 च्यावर शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, ४0३ शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. अकोला जिल्हय़ात सहा मूत्यू, तर १0५ च्यावर मजुरांना विषबाधा झाली आहे. 
आठ दिवसांपूर्वीच अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज-२ मध्ये माहेश्‍वरी बायो फ्युएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅर कंपनी फेज-२ प्लॉट न. एफ -२२ मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणांहून विभागीय गुणनियंत्रक विभागाच्या चमूने दोन्ही ठिकाणचे गोदाम सील करू न तण व कीटकनाशके जप्त केली आहेत.
 

Web Title: 14 crore 31 lakh rupees pesticide seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.