दगडफेक करणारे १४ अटकेत

By admin | Published: March 17, 2017 03:15 AM2017-03-17T03:15:04+5:302017-03-17T03:15:04+5:30

१00 जणांवर दंगलीचा गुन्हा : आरोपींची कारागृहात रवानगी.

14 detainee detained | दगडफेक करणारे १४ अटकेत

दगडफेक करणारे १४ अटकेत

Next

अकोला, दि. १६- किरकोळ वादातून जमाव जमवून पोलिसांवर दगडफेक करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडणार्‍या १00 जणांविरुद्ध अकोट फैल पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. त्यापैकी १४ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. पोलीस नाईक अशोक पातोंड यांच्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री १.३0 वाजताच्या सुमारास ठाण्यातील पोलीस कर्मचारी रात्रगस्त घालत होते. दरम्यान, रस्त्यावरून सेव व चिवडा विकणारा मोहम्मद नईम मोहम्मद आरिफ हा जात होता. पोलिसांनी त्याला विक्री थांबविण्यास बजावले आणि घरी निघून जाण्यास सांगितले; परंतु पोलिसांच्या म्हणण्याकडे मो. नईम याने दुर्लक्ष करून आपली हातगाडी रामदासमठाजवळील रस्त्याच्या मधोमध उभी केली. पोलिसांनी त्याला परत हटकल्यानंतर त्याने पोलिसांसोबत वाद घातला आणि परिसरातील जमाव गोळा केला. जमावाने पोलीस कर्मचार्‍यांसोबत हुज्जत घालत, धक्काबुक्की केली आणि पोलीस कर्मचार्‍याच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून घेतली. जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात आरसीपी शिपाई अनुप हरिभाऊ आसटकर हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार बालाजी राणे घटनास्थळावर पोहोचले. जमाव जमवून पोलिसांवर दगडफेक करणारे मोहम्मद शोएब मोहम्मद आसिफ (१८), मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार (५५), अब्दुल मजीद शेख हबीब (३५), उस्मान शह लुकमान शाह (३0), शेख मुजीब शेख हबीब (३५), मोहम्मद अनिस अब्दुल सत्तार (३0), शेख शहादत इरफान शेख शब्बीर (२५), मिर्जा शाह युसूफ शाह (२४), कय्युम शाह करीम शाह (२१), मोहम्मद इरफान मोहम्मद आरिफ (१९), सेवानवृत्त शिक्षक शेख हबीब शेख बिसमिल्लाह (७0), अँड. शेख अब्दुल्लाह शेख हबीब (३७), मोहम्मद युसूफ मोहम्मद उस्मान (७0), मोहम्मद नईम मोहम्मद उस्मान (१८) यांच्यासह १00 जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३३३, ३३६, ३२४, २८३, ४२७, ११७ नुसार गुन्हा दाखल केला. बुधवारी झालेल्या घटनेनंतर अकोट फैल परिसरात तणाव निर्माण झाला होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title: 14 detainee detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.