टोळीने गुन्हे करणारे १४ जन जिल्ह्यातून तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:04 PM2018-10-02T18:04:23+5:302018-10-02T18:04:49+5:30
अकोला -शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोला पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी विशेष अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील १४ जणांना मंगळवारी तडीपार केले आहे.
अकोला -शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोलापोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी विशेष अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील १४ जणांना मंगळवारी तडीपार केले आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिया खान अलियार खान, जावेद खान अलियार खान, वाजीद खान अलीयार खान तिघेही राहणार नवाबपुरा यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर माना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगेश राजू मोहोळ राहणार शेलू वेताळ, आकाश निरंजन मोहोळ राहणार शेलू वेताळ, सतीश उर्फ संतोष रामेश्वर रवीराव राहनार अर्जुन नगर अमरावती, अविनाश बाबुराव वानखडे रा. राजुरा सरोदे, अर्जुन मेघराज पवार राजुरा सरोदे, अब्दुल तेहसीन अब्दुल मतीन रा. मुर्तीजापुर या सहा आरोपींनाही जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यासोबतच उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहसीन खान ऊर्फ मिठू अलियार खान, इमाम खा सुजात खा दोघेही राहणार गायगाव तसेच शेख रईस शेख इस्माईल व शेख इमरान शेख कयूम दोघेही राहणार गायगाव या १४ आरोपींना पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५ च्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे पोलीस कर्मचारी विजय बावस्कर, सुषमा घुगे, मंगेश महल्ले यांनी केली आहे. येणाº्या काळातील सण-उत्सव लक्षात घेता या १४ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना जिल्ह्यातून तडीपार केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी दिली.