राहीत येथे १४० जणांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:44+5:302021-03-29T04:12:44+5:30
प्रथम राहीत गावच्या सरपंच अलका शिवाजीराव देशमुख यांना लस देण्यात आली. उपसरपंच हरिदास अघडते, ग्रामपंचायत सदस्य अतुल देशमुख, राणी ...
प्रथम राहीत गावच्या सरपंच अलका शिवाजीराव देशमुख यांना लस देण्यात आली. उपसरपंच हरिदास अघडते, ग्रामपंचायत सदस्य अतुल देशमुख, राणी कटाळे, ग्रामसेवक ज्योती टाले, पंकज देशमुख, गोपाळ कटाळे आदींनी लसीकरण करून घेतले.
राहीत येथील आरोग्य उपकेंद्रात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील स्त्री, पुरुष, शुगर व बीपी असलेल्यांना लस देण्यात आली. उपकेंद्रात येणाऱ्या साहीत, निंबी, खांबोरा, टाकळी (छबिले) या गावांतील लोकांनी लाभ घेतला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष शर्मा, लसीकरण अधिकारी उमेश ताटे, पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे, आरोग्य सहायक नवलकार, आरोग्य सेविका कांगटे, शरद ठाकूर, सीएचओ भूषण राठोड, आरोग्य सेवक देवीदास सोळंके, आरोग्य सेविका संगीता जाधव, आशा स्वयंसेविका रेखा चव्हाण, कोकिळा बिरडे, अंगणवाडी सेविका यशोदा देशमुख, नलिनी निमकर्डे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
फोटाे :