मनपाचे १४१ कंत्राटी कर्मचारी दोन महिन्यांपासून आदेशाविना सेवारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:16 PM2018-12-05T13:16:48+5:302018-12-05T13:17:12+5:30
कोणतेही आदेश नसताना अकोला महापालिकेत १४१ कर्मचारी कार्यरत आहे.
अकोला: अकोला महापालिकेतील विविध विभागातील कामकाजासाठी गत १५ ते १८ वर्षांपासून १४१ कर्मचारी कंत्राटी करारावर कार्यरत आहे. दरवर्षी त्यांना नव्याने आदेश देऊन सेवेत घेण्यात येते. यंदा मात्र दोन महिने उलटूनही या कर्मचाºयांचा करार झालेला नाही. कोणतेही आदेश नसताना अकोला महापालिकेत १४१ कर्मचारी कार्यरत आहे.
अकोला महापालिकेतील सुरक्षा विभाग, वाहन चालक विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभागात १४१ कर्मचारी गेल्या १५ ते १८ वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. या कर्मचाºयांनी कुठेही संघटना करू नये, असे त्यांच्या नोंदी करारात नमूद आहे. त्यामुळे हे कर्मचारी कायदेशीर बांधलेले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कर्मचाºयांना पुढील नेमणुकीचा आदेश महापालिकेने दिलेला नसताना ते कार्यरत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे अतिक्रमण विभागाचे आणि नगररचनाचे अधिकारी-कर्मचारी आहे. शहरातील अनधिकृत अतिक्रमण पाडणारे कर्मचारीच सध्या अनधिकृत आहे. त्यामुळे काही कर्मचाºयांवर या दरम्यानची कारवाई अंगलटदेखील येऊ शकते. अकोला महापालिकेच्या आमसभेत तातडीने नवीन नेमणुकीचे आदेश देण्याची गरज आहे; पण अजून तरी आमसभेत हा विषय आलेला नाही. महापालिका पदाधिकाºयांचे लक्ष वेधावे म्हणून काही कंत्राटी कर्मचारी-अधिकाºयांनी विनंती केली आहे; मात्र अजून तरी त्यांना न्याय मिळालेला नाही.
आउट सोर्सिंग सेवेतील कर्मचारी वेगळे
१४१ कंत्राटी कर्मचाºयांसारखा कायदेशीर पेच भविष्यात येऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने काही कर्मचाºयांना आउट सोर्सिंग पद्धतीने कामावर घेतले आहे. या कर्मचाºयांचा आणि महापालिकेचा थेट संबध नाही. कंत्राटदारांशी झालेल्या करारावर हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना केवळ कंत्राटदाराकडेच दाद मागता येते.