आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४८ जणांवर गुन्हे
By admin | Published: October 10, 2014 01:16 AM2014-10-10T01:16:56+5:302014-10-10T01:16:56+5:30
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अकोला जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे शिवसेनेशी संबंधितांवर.
अकोला : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निवडणूक विभाग व पोलिस विभागाच्या तक्रारीनुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी १४८ जणांवर गुन्हे दाखल केले. यात सर्वाधिक गुन्हे शिवसेनेशी संबंधित उमेदवार व त्यांच्या प्रचार करणार्या वाहनचालकांवर दाखल आहेत. भाजपशी संबंधित ३, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ४ आणि काँग्रेसशी संबंधित ३ जणांवर गुन्हे दाखल आहेत.
२२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान पोलिसांनी बळीराम गोंडूजी इंगळे (मूर्तिजापूर),अफजल खान आसिफ खान (आकोट) यांच्यासह ५0 जण आणि गुलाबराव गावंडे, युवराज गावंडे, संग्राम गावंडे यांच्यासह ६0 जण, उमेश नांदूरकर (मोठी उमरी), रामभाऊ नथ्थुजी ठोकळ (मूर्तिजापूर), गजानन सं पत शिराळे (मूर्तिजापूर), नईम उल्ला खान (अगरवेस), सुरेश सोमठाणे (दगडी पूल), लहानू येले (माना), लक्ष्मण भोंगळे, गजानन तांबळे, रामचंद्र खाडे (माना), शेख सलीम (बोरगाव मंजू), चेतन सदाशिव राऊत (बोरगाव मंजू), मनोज चावरे (अकोला), तन्वीर अहमद (अकोला), संघपाल साहेबराव उमाळे (शिवणी), राहुल विनायक वानखडे (अकोला), प्रकाश विलासराव काळे (दहीहांडा), संजय धारपवार (माना), काशीराम धांडे, वासुदेव घेगाटे (पातूर), शेख फकिरा, विनोद इंगळे (बाळापूर), महेबूब उस्मान (जुने शहर), रणधीर सावरकर, गोपीकिसन बाजोरिया (अकोला), अब्दुल वसीम अ. बदर (बाश्रीटाकळी), रवींद्र राठोड (मूर्तिजापूर), संदीप दादाराव पाटील लोड (मनारखेड) आदींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.