बालकांच्या नेत्रविकारात १५ ते २० टक्क्यांनी वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:56 AM2020-10-11T10:56:02+5:302020-10-11T10:56:31+5:30
Eye diseases in children दहापैकी किमान दोन ते तीन बालकांना चष्मा लागत असल्याचे नेत्र तज्ज्ञांनी सांगितले.
अकोला: लॉकडाऊनमुळे गत सहा महिन्यांपासून शाळा, कार्यालये बंद होती. त्यामुळे जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेत. कार्यालयीन कामकाज अन् विद्यार्थ्यांचा अभ्यास घरूनच सुरू झाला. त्यामुळे सर्वच घटकांचा मोबाइल, लॅपटॉपवरील स्क्रीन टाइम वाढला. इतरांच्या तुलनेत बालकांना त्याचा जास्त फटका बसला असून, बालकांमधील नेत्रविकारामध्ये जवळपास १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.
मागील सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शाळेचा अभ्यास आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. याशिवाय, इतरही हॉबी क्लासेस आता आॅनलाइन माध्यमातूनच घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ हा मोबाइल स्क्रीनवर वाढला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ््यांवर होत असून, डोळ््यांचे विकार उद््भवू लागले आहेत. मोबाइल, लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे बालकांमध्ये डोळ््यांचा कोरडेपणा, डोळ््यांना खाज सुटणे, डोळ््यांच्या कडा लाल होणे, अश्रू येणे, अशा समस्या वाढू लागल्या आहेत. अभ्यासासोबतच विद्यार्थी मनोरंजनासाठी म्हणूनही मोबाइल्सचा वापर करत आहेत. स्क्रीन टाइमवर झालेला अतिरेक विद्यार्थ्यांच्या डोळ््यांसाठी घातक ठरत आहे. डोळ््यांवरचा ताण वाढल्याने नेत्रतज्ज्ञांकडे जाणाऱ्या दहापैकी किमान दोन ते तीन बालकांना चष्मा लागत असल्याचे नेत्र तज्ज्ञांनी सांगितले.
असे होत आहेत दुष्परिणाम
- डोळ््यातील पाण्याचे प्रमाण घटणे
- डोळे लाल होणे
- दूरचे कमी दिसणे
- डोळ््यात जळजळ होणे
- डोळ््यांखाली काळी वर्तुळे वाढणे
- प्रारंभी डोळे आणि नंतर डोकेदुखीचा त्रास होणे
- चष्मा लागणे, कालांतराने चष्म्याचे नंबर वाढणे
डोळ््यांना आराम देण्यासाठी हे करा
- मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही आदींचा वापर कामापुरताच करा
- अंधारात स्क्रीनचा वापर टाळा
- अँटिलेअर कोटिंग चष्म्याचा वापर करा (नंबर नसला तरी हा चष्मा वापरता येतो.)
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरात आयड्रॉप ठेवा.
मागील काही महिन्यात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे नेत्रविकारांचे प्रमाण वाढले आहे. यापासून बचावासाठी स्क्रीन टाइम कमी करण्याची गरज आहे. मोबाइलवरील गेम्सऐवजी मुलांना पारंपरिक खेळांची ओळख करून देण्याची गरज आहे.
- डॉ. जुगल चिराणिया, नेत्रतज्ज्ञ,अकोला.