पोकरा अंतर्गत १५ कोटींचे अनुदान वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:49+5:302021-05-09T04:18:49+5:30

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये सात तालुक्यातील ४८६ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ...

15 crore grant distributed under Pokra | पोकरा अंतर्गत १५ कोटींचे अनुदान वितरित

पोकरा अंतर्गत १५ कोटींचे अनुदान वितरित

Next

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये सात तालुक्यातील ४८६ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. त्यापैकी ७ हजार ६०३ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ ठिबक-तुषार सिंचन योजनेसाठी देण्यात आला.

--बॉक्स--

योजनेतून लाभार्थींना केलेले अनुदान वाटप

वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी १२२ लाभार्थींना ७६ लाख ३२ हजार रुपये, शेततळ्यांसाठी ९ लाभार्थींना ४ लाख ७८ हजार रुपये, होस्ट फार्मरसाठी ६२८ लाभार्थींना ४० लाख ८४ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. ठिबक तुषारसाठी ३,१८३ लाभार्थींना ७ कोटी २७ लाख ५९ हजार रुपये, शेळीपालनसाठी ७९८ लाभार्थींना २ कोटी ६१ लाख ३३ हजार रुपये, बीजोत्पादनसाठी १७१४ लाभार्थींना १ कोटी ७१ लाख ७२ हजार रुपये, पाइप-मोटरसाठी १ हजार १४९ लाभार्थींना १ कोटी ८९ लाख ८४ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.

Web Title: 15 crore grant distributed under Pokra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.