सहा पीडित महिलांना १५ लाखांची मदत
By admin | Published: November 6, 2014 01:00 AM2014-11-06T01:00:43+5:302014-11-06T01:00:43+5:30
‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील सहा पीडित महिलांना १५ लाख ४0 हजारांची मदत मंजूर.
अकोला : मनोधैय योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार पीडित जिल्ह्यातील सहा महिलांना जिल्हा प्रशासनामार्फत १५ लाख ४0 हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार व फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अत्याचार पीडित महिलांना मदतीचा आधार देण्यासाठी शासनामार्फत ह्यमनोधैर्यह्ण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत अत्याचार पीडित महिलांना दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. गत ऑक्टोबर ते ऑक्टोबर अखेरपर्यंत लैंगिक अत्याचाराची ११ प्रकरणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. अत्याचार पीडित महिलांना मदत देण्याबाबत जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा मंडळाच्या सभेत ११ पैकी सहा अत्याचार पीडित महिलांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली, तर उर्वरित पाच प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. मदतीसाठी पात्र ठरलेल्या अत्याचार पीडित सहा महिलांना १५ लाख ४0 हजारांची मदत मंजूर करण्यात आली. ही मदत वाटपाचे काम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे.