मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित!

By admin | Published: October 10, 2014 11:11 PM2014-10-10T23:11:35+5:302014-10-10T23:39:15+5:30

खरीप मक्याला क्विंटलमागे १२00 रुपये दर मिळण्याची शक्यता.

1.5 percent increase in maize production expected! | मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित!

मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित!

Next

अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी खरीप मक्याच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्के, म्हणजे सुमारे १.१३ कोटी टन मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील या मक्याला राज्यात ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची श क्यता वर्तविली जात आहे. देशातील एकूण मका उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९ टक्के आहे.
तृणधान्य प्रकारात मोडणार्‍या मका या पिकाच्या उत्पादनात गत पाच वर्षांमध्ये जगभरात मोठी वाढ झाली आहे. जगभरातील मक्याच्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के मका कुक्कुट खाद्य म्हणून वापरला जातो. २0 टक्के मक्याचा वापर स्टार्च उद्योगात आणि उर्वरित मका अल्कोहोल तयार करण्यासाठी वा परला जातो. २0१४ मध्ये जगभरात ९.८१ कोटी टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे. २0१३ मध्ये ८.६८ कोटी टन उत्पादन झाले होते. यावर्षी १.५ टक्के म्हणजे १.१३ कोटी टन जास्त उत्पादन अ पेक्षित आहे. जगभरात ९.५0 कोटी टन मक्याची गरज आहे. देशातील एकूण मका उत्पादनापैकी सर्वाधिक २१ टक्के उत्पादन आंध्र प्रदेशात होते. त्यापाठोपाठ १६ टक्के कर्नाटक, १0 टक्के राजस्थान, ९ टक्के महाराष्ट्र आणि प्रत्येकी ६ टक्के मका उत्पादन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात होते. मक्याच्या उत् पादनात यावर्षी जगभरात वाढ झाली असली, तरी यावर्षी अनियमित पावसामुळे भारतातून निर्यात होणार्‍या मक्याच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग आणि कृषी विपणन केंद्राने धुळे येथील बाजारपेठेतील मागील २४ वर्षांच्या मासिक दराचे पृथ्थकरण करून काढलेल्या निकर्षानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मक्याचे दर ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल राहतील, असा अंदाज वर्तविला आहे.

Web Title: 1.5 percent increase in maize production expected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.