अकोला जीएमसीत १५ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:47 PM2021-02-18T18:47:01+5:302021-02-18T18:49:05+5:30

Akola GMC विद्यार्थी व निवासी डॉक्टर, असे एकूण ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

15 resident doctors from Akola GM are corona positive | अकोला जीएमसीत १५ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जीएमसीत १५ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देयापूर्वी येथील ५२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती.आता १५ निवासी डॉक्टरांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांपाठोपाठ आता १५ निवासी डॉक्टरांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी येथील ५२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व निवासी डॉक्टर, असे एकूण ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे अभ्यासवर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरू झाले. एका पाठोपाठ एक, असे एकूण ५२ विद्यार्थ्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासवर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांपाठोपाठ आता निवासी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील १५ निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर असे एकूण ६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबतच डॉक्टरांमध्ये वाढता कोरोना संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असून योग्य वेळी खबरदारी घेण्याची गरज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: 15 resident doctors from Akola GM are corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.