शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली १५०० किंटल तूर ‘नाफेड’ने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:45 PM2018-03-08T13:45:59+5:302018-03-08T13:45:59+5:30

पिंजर  (जि. अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर वेअर हाउसने परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावरील आठ हजार क्विंटल  तुरीची खरेदी झाली होती.

The 1500 quintal tur bought by the farmers was made by Nafeed | शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली १५०० किंटल तूर ‘नाफेड’ने केली परत

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली १५०० किंटल तूर ‘नाफेड’ने केली परत

Next
ठळक मुद्देबार्शीटाकळी तालुक्यामध्ये नाफेडचे एकमेव खरेदी केंद्र पिंजर येथे सुरू करण्यात आले आहे.पिंजर येथील केंद्रावर आतापर्यंत आठ हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली.स्टार अ‍ॅग्री कंपनीच्या ग्रेडरने यातील १५०० क्विंटल तूर नापास केली. त्यामुळे, ही तूर पिंजर केंद्रावर परत पाठवण्यात आली आहे.

- चंद्रशेखर ठाकरे 

पिंजर  (जि. अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर वेअर हाउसने परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावरील आठ हजार क्विंटल  तुरीची खरेदी झाली होती. तूर परत आल्याने शेतकऱ्यांचे चुकारेही लांबणीवर पडले आहेत. तूरीचा दर्जा उत्तम असतानाही परत केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देउन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यामध्ये नाफेडचे एकमेव खरेदी केंद्र पिंजर येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर ६ फेब्रुवारीपासून तूर खरेदीस प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील आठ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाइर्न नोंदणी केली होती. त्यापैकी ५०६ शेतकऱ्यांची तूर मोजणी होउन खरेदी झालेली आहे. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. पिंजर येथील केंद्रावर आतापर्यंत आठ हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली.
तूर खरेदीसाठी नाफेडच्या निकषानुसार पिंजर केंद्रावरील ग्रेडरने ही तूर पास केलेली आहे. तसेच आर्द्रता आणि चाळणी करून ही तूर खरेदी करण्यात आली आहे. केंद्रावर खरेदी केलेली आठ हजार ३३७ क्विंटल तूर अकोला येथील वेअर हाउसला साठवणुकीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र, एमएसडब्ल्यूसी वरील स्टार अ‍ॅग्री कंपनीच्या ग्रेडरने यातील १५०० क्विंटल तूर नापास केली. त्यामुळे, ही तूर पिंजर केंद्रावर परत पाठवण्यात आली आहे. त्यामुळे, तूर विक्री करणाºया शेतकऱ्यांचे चुकारेही रखडले आहेत. केंद्रावर आतापर्यंत विक्र ी करणाºया एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर तुरीचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे, शेतकरी आर्थीक अडचणीत सापडले आहेत. शेतकvनी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देउन परत पाठवलेली तूर वेअर हाउसला उतरवण्याची मागणी जिल्हाधिकरी, जिल्हा उप निबंधक व इतरांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वाहतुकीचा भुर्दंड बसणार
पिंजर केंद्रावरील १५०० क्विंटल तूर वेअर हाउसने नापास केल्याने ती परत पाठवण्यात आली आहे. ही तूर परत पाठवण्यासाठी येणाºया वाहतुकीच्या खर्चाचा भुर्दंड खरेदी विक्री संस्थेला बसणार आहे. त्यामुळे, ही तूर अकोल्यातील वेअर हाउसला उतरवण्याची मागणी खरेदी विक्री संस्थेने केली आहे.

तूर खरेदी बंद
वेअर हाउस वरील ग्रेडरने नापास केल्याने परत आल्याने पिंजर येथील केंद्रावरील तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. या केंद्रावर आतापर्यंत ५०६ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने तुरीच्या वजनात घट येणार आहे. तालुक्यातील ७ हजाराच्यावर शेतकºयांना अजुनही तूर मोजणीची प्रतीक्षा आहे. शेतकºयांच्या घरातच तूर पडून आहे. सर्वच शेतकºयांच्या तूर खरेदीसाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे, पूर्ण शेतकºयांची तूर खरेदी करण्याची मागणी होत आहे.

पिंजर केंद्रावर खरेदी केलेली तूर उत्तम दर्जाची आहे. केंद्रावरील ग्रेडरने पास केलेली तूर वेअर हाउसवरील ग्रेडरने नापास केल्याने शेतकरी व खरेदी विक्री संस्था अडचणीत येणार आहे. संबधीत तूर वेअर हाउसला उतरवण्याची मागणी संबधीत अधिकाºयांकडे केली आहे.
- अशोक राठोड, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ, बार्शीटाकळी

Web Title: The 1500 quintal tur bought by the farmers was made by Nafeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.