अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५८ कोटीची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:33 PM2019-12-15T13:33:32+5:302019-12-15T13:33:40+5:30

तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

158 crore assistance distributed to the farmers | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५८ कोटीची मदत वितरित!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५८ कोटीची मदत वितरित!

Next

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसºया टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शनिवार, १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी १८ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनामार्फत १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतर मदत वाटपाच्या दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत १३ डिसेंबर रोजी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या आदेशानुसार मदतीची रक्कम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.

तालुकानिहाय रक्कम!
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी दुसºया टप्प्यात १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत १४ डिसेंबर रोजी सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-३० कोटी ४ लाख ३५ हजार रुपये, बार्शीटाकळी तालुका -१८ कोटी ८२ लाख २२ हजार रुपये, अकोट तालुका-२८ कोटी २५ लाख ६९ हजार रुपये, तेल्हारा तालुका-२० कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये, बाळापूर तालुका -२२ कोटी ४६ लाख ७१ हजार रुपये, पातूर तालुका-१६ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी २१ कोटी ६४ लाख ४२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

Web Title: 158 crore assistance distributed to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.