१६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले!

By admin | Published: July 13, 2017 01:08 AM2017-07-13T01:08:28+5:302017-07-13T01:08:28+5:30

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती...

16 lakhs of bombs exploded due to luxurious gipsy! | १६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले!

१६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले!

Next

सचिन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती. दोन वर्षांपासून प्रकरण शांत असताना, एका आलिशान जिप्सीवरून रोकड पळविणाऱ्यांमध्येच चर्चा झाली अन् या प्रकरणाचे बिंग फुटले. जुने शहरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
सरकारी बगीच्याजवळून जात असताना व्यापाऱ्याची एका टोळक्याने १६ लाख रुपयांची बॅग पळविली होती. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, शोध लागला नाही. या लुटमारीनंतर १६ लाख रुपयांची हिस्सेवाटणी करण्यात आली. या टोळीतील म्होरक्याने त्याच्या साथिदारांना बॅगमध्ये केवळ आठ लाखच असल्याचे सांगत, आधीच आठ लाख रुपयांवर डल्ला मारून घेतला. त्यानंतर उर्वरित आठ लाखांमधील दीड लाख एका खास साथीदाराला दिले, तर उर्वरित ५० हजारांप्रमाणे अन्य साथीदारांना वाटप केले. या वाटपानंतर प्रकरण शांत झाले; मात्र टोळीच्या म्होरक्याने काही महिन्यातच वेगळी जिप्सी कार खरेदी केली आणि यातच त्याच्या साथीदारांच्या भुवया उंचावल्या. टोळीचा म्होरक्या वगळता अन्य साथीदार एका बारमध्ये बसल्यानंतर हा प्रकार जोरात बोलल्या गेला, त्यानंतर सदर प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांना हा प्रकार माहिती होताच टोळीचा म्होरक्या आणि दीड लाखांची रक्कम घेणारा साथीदार दोघांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी सुरू असतानाच काही मोठे नावे समोर येणार असल्याचा संशय व्यक्त करण््यात येत आहे.

‘बाजीराव’ने तीन तास धुलाई!
दोघांमधील एक पहीलवान असल्याने त्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन ते तीन तास धुलाई केल्याची माहिती आहे. यामध्ये ताब्यात घेतलेल्या युवकाने अचानकच डोळे बंद केले. त्यामुळे मरणासन्न अवस्थेतच त्याला पोलिसांनी खुल्या जागेत टाकले. बरेच वेळ हालचाल न झाल्याने पोलिसांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र, दोन तासांनंतर हा युवक उठल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तक्रार तीन लाखांची
व्यापाऱ्याच्या बॅगमधून तब्बल १६ लाख पळविल्या गेले. मात्र म्होरक्याने ही रक्कम केवळ आठ लाख दाखविली. तर पोलीसात दाखल असलेल्या तक्रारीत केवळ ३ लाख १५ हजार चोरी गेल्याचे नमूद आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम कमी करण्यामागे काय गोडबंगाल आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: 16 lakhs of bombs exploded due to luxurious gipsy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.