रेल्वे मालधक्क्यावरून खताची १६0 पोती लांबविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:50 PM2018-07-30T12:50:59+5:302018-07-30T12:53:31+5:30
अकोला: रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावरून अज्ञात चोरट्याने १६0 खतांची पोती लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
अकोला: रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावरून अज्ञात चोरट्याने १६0 खतांची पोती लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गीतानगरात राहणारे नीलेश कैलासचंद पाटील (४७) यांच्या तक्रारीनुसार, ते खताचे व्यापारी आहेत. त्यांनी विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई येथील इंडियन पोटँरा लि. कंपनीतून डीएपी खताची ८० हजार ९६८ पोती मागविली होती. २८ जून रोजी त्यांच्या खताची पोती रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर उतरविण्यात आली. खतांची पोती २९ जूनपर्यंत मालधक्क्यावरच पडून होती. रविवारी नीलेश पाटील हे मालधक्क्यावर खताची पोती आणण्यास गेले होते. त्यांनी खताच्या पोत्यांची मोजणी केली. मोजणीदरम्यान १६0 खताची पोती कमी भरली. अज्ञात चोरट्याने ही खताची पोती लंपास केली. या खताची किंमत दोन लाख रुपये आहे. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)