अंगणवाडी कर्मचा-यांच्या १६0 कोटींची ‘भाऊबीज भेट’!

By admin | Published: September 24, 2015 11:39 PM2015-09-24T23:39:27+5:302015-09-24T23:39:27+5:30

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शासनाचा निर्णय.

160-crore 'brother-in-law' gift for Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचा-यांच्या १६0 कोटींची ‘भाऊबीज भेट’!

अंगणवाडी कर्मचा-यांच्या १६0 कोटींची ‘भाऊबीज भेट’!

Next

कारंजा (वाशिम): शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचार्‍यांना २0१४-१५ व १५-१६ या दोन वर्षासाठी ह्यभाऊबीज भेटह्ण म्हणून १५९ कोटी ८९ लाख १0 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार प्रतिवर्ष हजार रुपये प्रमाणे दोन हजार रुपयांची भेट अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या कर्मचार्‍यांना सन २0१४-१५ मधील प्रलंबित असलेल्या भाऊबीज भेटीपोटी प्रत्येकी १ हजार रुपये, तसेच सन २0१५-१६ या चालू वर्षात प्रत्येकी १ हजार रुपये भाऊबीज भेट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार अंगणवाडी कर्मचार्‍यांना भाऊबीज भेट म्हणून १५९ कोटी ८९ लाख १0 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २३ सप्टेंबर रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निधीमधून अंगणवाडी कर्मचार्‍यांना २0१४-१५ ची प्रलंबित भाऊबीज भेट चालू महिन्यात अदा करण्यात येणार असून, २0१५-१६ या वर्षासाठीची भाऊबीज भेट नोव्हेंबर महिन्यात दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: 160-crore 'brother-in-law' gift for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.