मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी!

By admin | Published: March 25, 2017 01:55 AM2017-03-25T01:55:00+5:302017-03-25T01:55:00+5:30

अतिरिक्त निधीसह १२३ कोटींच्या जिल्हा आराखड्यास मंजुरी

162 crore sought; 17 crore received! | मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी!

मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी!

Next

संतोष येलकर
अकोला, दि. २४-जिल्ह्यात विविध योजना आणि विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त १६२ कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत जिल्ह्यासाठी १७ कोटी ४0 लाखांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देत, अतिरिक्त निधीसह जिल्हा वार्षिक योजनेच्या १२३ कोटी २४ लाखांच्या आराखड्यास १६ मार्च रोजी शासनाच्या अर्थ खात्याने मंजुरी दिली.
शासनाच्या कमाल आर्थिक र्मयादेनुसार सन २0१७-१८ या वर्षीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १0५ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गत २ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा व सामान्य सेवा, परिवहन आणि नावीन्यपूर्ण, बळकटीकरण व मूल्यमापनाच्या विकासकामांचा समावेश आहे. मंजूर प्रारूप आराखड्याव्यतिरिक्त जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत योजना आणि विकास कामांसाठी विविध विभागामार्फत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत ५ मार्च रोजी नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६२ कोटी ९ लाख २९ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत जिल्ह्यासाठी १७ कोटी ४0 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून, अतिरिक्त निधीसह १२३ कोटी २४ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा शासनाच्या अर्थ विभागामार्फत १६ मार्च रोजी मंजूर करण्यात आला.

जलसंधारण, रस्ते, शौचालयांसाठी अतिरिक्त १७ कोटी मंजूर!
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यापैकी १७ कोटी ४0 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. केंद्र शासन पुरस्कृत जलसंधारण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि शौचालयांच्या बांधकामांसाठी हा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.

अतिरिक्त निधीची अशी करण्यात आली होती मागणी!
क्षेत्र                                  निधी
कृषी व संलग्न सेवा             १५ कोटी ४२ लाख 0६ हजार
ग्राम विकास                      0५ कोटी ३0 लाख ३४ हजार
सामाजिक व सामूहिक सेवा  ७३ कोटी ४८ लाख २२ हजार
पाटबंधारे आणि पूरनियंत्रण  0२ कोटी ६१ लाख ६७ हजार
ऊर्जा                                 0६ कोटी ..... ......
परिवहन                           ५१ कोटी ८१ लाख ६0 हजार
सामान्य आर्थिक सेवा         0२ कोटी ५0 लाख ......
सामान्य सेवा                    0४ कोटी ९५ लाख ४0 हजार

Web Title: 162 crore sought; 17 crore received!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.